Pune Crime News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यापासून राज्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीचं नाव चर्चेत आहेत. या टोळीच्या नावाने धमकावून खंडणी मागण्याचे प्रकार राज्यात (Pune Crime) घडू लागले आहेत. असाच धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. शहरातील एका प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाला लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने दहा कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराने पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या व्यावसायिकाला धमकीचा एक ई मेल आला असून या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सुरू केला आहे.
Pune Porsche Car : तीनशे शब्दांचा निबंध लिहायला सांगणारे बाल न्याय मंडळाचे ‘ते’ दोन अधिकारी बडतर्फ
शहरातील एका प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाला लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या नावे दहा कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सराफ व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावणारा इमेल पाठविण्यात आला आहे. या प्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. गुन्हे शाखेकडून या प्रकाराचा तपास सुरू करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार शनिवारी उघडकीस आला. त्यानंतर गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करण्यात आली. बिश्नोई टोळीला दहा कोटींची खंडणी दिली नाही तर बाबा सिद्दीकीप्रमाणे अवस्था करू. खंडणीची रक्कम कधी आणि कशा प्रकारे द्यायची यासाठी दुसरा मेल पाठवून देऊ असे यात म्हटलं आहे. या माहितीला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे.
पोलिसांनी ई मेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू केला आहे. धमकीचा ई मेल पाठवणारा पुणे शहर परिसरातील असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला आहे. सायबर गुन्हेगारांकडून आर्थिक फसवणूक आणि खंडणीसाठी ई मेल पाठवून धमकावण्यात येत आहे. हा ई मेल सायबर गुन्हेगारांनी पाठवला की बिश्नोई टोळीकडून आला याचा तपास पोलिसांकडू सुरू असल्याचे सांगण्यात आले.
सलमान खान बिश्नोई समाजाची माफी मागणार का?, वडिल सलीम खान यांनी एका वाक्यात विषय संपवला
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई टोळीने स्वीकारली होती. या प्रकरणात पोलिसांनी वारजे परिसरातून एकाला ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे पुणे शहरातही बिश्नोई टोळी सक्रिय असल्याचे दिसून येत आहे.