Pune Porsche Car : तीनशे शब्दांचा निबंध लिहायला सांगणारे बाल न्याय मंडळाचे ‘ते’ दोन अधिकारी बडतर्फ

  • Written By: Published:
Pune Porsche Car : तीनशे शब्दांचा निबंध लिहायला सांगणारे बाल न्याय मंडळाचे ‘ते’ दोन अधिकारी बडतर्फ

Pune Porsche Car Accident Updates : काही दिवसांपूर्वी झालेल्या पुणे पोर्शे का अपघात (Pune Porsche Car Accident ) प्रकरणी मोठी अपडेट समोर आलीये. पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला केवळ 300 शब्दांचा निबंध लिहिण्याचे निर्देश देऊन त्याची सुटका करणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या (Juvenile Justice Board) 2 सदस्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.

Chitale Bandhu : ‘चितळे बंधू यांच्या विस्ताराची कहाणी बघा… 

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात 19 मे रोजी हिट अँड रनची घटना घडली होती. या हिट अँड रन प्रकरणात दारूच्या नशेत पोर्श कार चालवल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली होती. भरधाव वेगाने गाडी चालवून दोन जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपीला त्यानंतर बाल हक्क न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले होते. यानंतर कविता थोरात आणि एल. एन. धनावडे या अधिकाऱ्यांनी त्याला 300 शब्दांचा निबंध लिही आणि पोलिसांसोबत काही दिवस काम कर अशा माफक अटींवर अल्पवयीन आरोपीला जामीन देण्यात आला होता.

नॉन क्रिमिलियरची मर्यादा दुपटीने वाढवली, नवे महामंडळे स्थापन; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयांचा धडाका 

दरम्यान, या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असताना आरोपीला केवळ निबंध लिहायचं सांगून जामीन दिल्याले संताप व्यक्त करण्यात आला होता. सोशल मीडियातही याचे तीव्र पडसाद उमटले होते. यानंतर हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते.

दरम्यान, महिला व बालविकास आयुक्तांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमली होती. या दोन अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी 5 अधिकाऱ्यांची समितीही नेमण्यात आली होती. या चौकशी समितीने जुलैमध्ये दीडशे पानांचा अहवाल सादर करत त्यात या दोन अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा नमूद केलं. त्यानंतर आता विभागाने त्यांच्यावर कारवाई करून त्यांना बडतर्फ केले.

समितीच्या शिफारशीनुसार सरकारने बाल न्याय मंडळाच्या सदस्य असलेल्या एल. एन. धनावडे आणि कविता थोरात यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube