आरोपीला आधी फाशी द्या अन् नंतर भेट घ्या; नसरापूर पीडित मुलीच्या वडिलांची राजकारण्यांना विनंती

Nasrapur Case : पुण्यातील नसरापूर गावात 4 वर्षीय चिमुकलीवर लैगिंक अत्याचार करुन हत्या करण्यात आलेल्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात संतापाची

Nasrapur Case

Nasrapur Case

Nasrapur Case : पुण्यातील नसरापूर गावात 4 वर्षीय चिमुकलीवर लैगिंक अत्याचार करुन हत्या करण्यात आलेल्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी होत आहे. नसरापूर गावात देखील नागरिक आणि चिमुरडीचे कुटुंबीयाकडून प्रचंड रोष पाहायला मिळत आहे. पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी 2 मे रोजी नवले ब्रिज येथे राष्ट्रीय महामार्ग थांबवत आंदोलन करण्यात आले होते तर आज नसरापूरसह भोर बंदची हाक देण्यात आली आहे.

तर दुसरीकडे या प्रकरणात राजकारण देखील सुरु झाले आहे. अनेक राजकारणी पीडित कुटुंबीयांची आणि नागरिकांची भेट घेताना पाहायला मिळत आहे मात्र पीडित मुलीचे वडिलांनी सोशल माडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

पीडित मुलीचे (Nasrapur Case) वडील म्हणाले की, आम्ही अस्थि विसर्जनसाठी देहू येथे जात आहोत. माझ्या कुटुंबियांचे सदस्य आणि मित्रमंडळींचा फोन येत आहे की, त्या ठिकाणी बरेचशे राजकारणी मंडळी सांत्वन करण्यासाठी आणि भेटीसाठी येत आहेत मात्र जोपर्यंत माझ्या मुलीला योग्य तो न्याय मिळत नाही. त्या नरधमाला फाशी होत नाही तोपर्यंत एकही राजकारण्याने माझ्या घरी आम्हाला भेटायला येऊ नये ही माझी विनंती आहे. जोपर्यंत त्या नराधमाला फाशी होत नाही तोपर्यंत कोणत्याही नेत्यांनी माझं सांत्वन करायला घरी येऊ नका असं पीडित मुलीचे वडील म्हणाले.

विधानपरिषद निवडणूक चार जणांचे उमेदवारी अर्ज बाद; तर ‘या’ नेत्यांची आमदारकी पक्की

पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल पिडित मुलीच्या वारजे येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं करुन दिलं. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी पूर्ण सहकार्य़ाचा आश्वसन दिले.

Exit mobile version