Download App

Pune Crime : येरवडा कारागृहात कॅरम खेळण्याच्या वादातून दोन कैद्यांमध्ये हाणामारी, डोक्यात घातला पाटा…

  • Written By: Last Updated:

Pune Crime : येरवडा कारागृहात दोन कैद्यांमध्ये बुधवारी रात्री झालेल्या वादामध्ये एका कैद्याने थेट दुसऱ्या कैद्याच्या डोक्यात जेवण बनवण्याचा पाटा घातला. (Pune Crime ) यात संबंधित कैदी गंभीर जखमी झाला आहे. गजा मारणे या टोळीतील गुंड आहे. मोक्का कारवाईच्या अंतर्गत येरवडा (Yerwada Police) येथील कारागृहात (prison) कैद आहेत. या कैद्यांमध्ये ही हाणामारी झाली असल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या येरवडा कारागृहातील बराकीत ७०० ते ८०० गुन्हेगार हे मोक्काअंतर्गत न्यायालयीन कोठडीत आहेत. बुधवारी दुपारी कारागृहातील कैदी कॅरम खेळत होते. या दरम्यान, दोन कैद्यांमध्ये आपापसात वाद झाला होता. दुपारची वेळ असल्याने सुरक्षारक्षकांचे या कायद्यांकडे लक्ष गेले व त्यांनी ही भांडणे लागलीच सोडवली.

Sanjay Raut : त्यांनी वकिली केली, पण कायद्याची पुस्तकं पुन्हा चाळायला हवी, राऊतांचा फडणवीसांना टोला

त्यानंतर या सर्वांना पुन्हा एकदा बराकित बंद करण्यात आले होते. मात्र, याच दिवशी रात्री कैदी तपासणी सुरू असताना पुन्हा एकदा या कैद्यांमधील वाद उफाळला. यावेळी एकाने दुसऱ्या टोळीच्या गुंडाच्या डोक्यात पाटा घातल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Tags

follow us