First Patient Death Of Guillain Barre Syndrome In Pune : राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोमने (Guillain Barre Syndrome) थैमान घातलंय. या आजाराचा पहिला बळी गेल्याचं समोर आलंय. पुण्यामध्ये या आजाराची लागण मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. या पेशंटने सोलापूरला (Pune News) जावून जीव सोडल्याची माहिती मिळतेय. पुणे शहरामध्ये गुलेन बॅरी सिंड्रोमची लागण झालेल्या पुण्यातील रुग्णाचा सोलापूरमध्ये 25 जानेवारी रोजी मृत्यू झालाय. या रूग्णालाच पुण्यातच जुलाबाचा त्रास सुरू झाला होता, असं समोर येत आहे.
मृत रूग्ण सनदी लेखापाल म्हणून एका खासगी कंपनीत कार्यरत होता. तो डीएसके विश्व धायरी परिसरामध्ये राहण्यास होता. 11 जानेवारी रोरजी त्यांना पुण्यात असतानाच जुलाबाचा त्रास सुरू झाला होता. त्यानंतर ते काही कामानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील त्यांच्या गावी गेलेले होते. परंतु सोलापूरला गेल्यानंतर त्यांचा अशक्तपणा अधिकच वाढला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी सोलापूरातील एका रूग्णालयात दाखल केले होतं.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत तिलक वर्माचा पराक्रम; टी-20 क्रिकेटमध्ये ठोकल्या नाबाद 338 धावा
तेथील डॉक्टरांनी त्यांना ‘जीबीएस’ म्हणजेच गुलेन बॅरी सिंड्रोम असल्याचं निदान केलं होतं. सुरूवातीला उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती स्थिर होती. परंतु त्यांना हातपायाची हालचाल करता येत नव्हती. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात पाच दिवस उपचार सुरू होते. परंतु तब्येत स्थिर असल्यामुळं शनिवारी अतिदक्षता विभागातून त्यांना हलवण्यात आलं होतं. त्यानंतर काही वेळातच त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिलीय. तर डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला, हे समजू शकलं नसल्याची प्रतिक्रिया दिलीय.
महाराष्ट्रात गुलेन-बॅरे सिंड्रोमचे सहा नवीन संशयित रूग्ण नोंदवले गेलेत. अशा परिस्थितीत आता पुण्यात एकूण 73 रूग्ण आहेत. यातील काहींची प्रकृती चिंताजनक असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या एकूण रुग्णांची संख्या 73 वर पोहोचली आहे, ज्यामध्ये 47 पुरुष आणि 26 महिला आहेत. त्यापैकी 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. अचानक वाढलेल्या रुग्णांच्या तपासासाठी आरोग्य विभागाने प्रयत्न तीव्र केलेत.
Video : अजित पवारांच्या निकटवर्तीयांने नागरिकाला उचलून आपटलं; डोक्याला व गुडघ्याला जखम
या आठवड्याच्या सुरुवातीपासून संशयित रुग्णांची संख्या 24 ने वाढली आहे. हे लक्षात घेऊन रॅपिड रिस्पॉन्स टीम (आरआरटी) तयार करण्यात आलीय. पुण्यात आठवडाभरात 20 हून अधिक संशयित रुग्ण सापडणे आरोग्य विभागासाठी चिंतेचा विषय बनला आहे. दरम्यान, आरोग्य अधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केलंय. अधिकाऱ्यांनी सांगितले की, महापालिका आणि जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांत सुमारे 7,200 घरांचं सर्वेक्षण केलंय.