Download App

Pune Rain Update: खडकवासलातून 45 हजार क्युसेकने विसर्ग; महापालिकेकडून संपर्क क्रमांक जाहीर

Flood threat to Pune : खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात होणार विसर्ग वाढविण्यात आलाय. त्यामुळे पुणे शहरात पाणी घुसण्याची शक्यता.

  • Written By: Last Updated:

Flood threat to Pune; Municipal Corporation announced contact number for citizens: पुणे शहरातील (Pune City) खडकवासला धरण (Khadakwasala) क्षेत्राच्या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. पानशेत, वरसगाव, टेमघर, खडकवासला या परिसरात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. पाणलोट क्षेत्रातील अतिपर्जन्यमानामुळे मुळा-मुठा नदीस पूर (Flood) आलेला आहे. (

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात होणार विसर्ग वाढविण्यात आलाय. रविवारी सकाळी विसर्ग हा 29 हजार क्युसेक इतका होता. तर सायंकाळी पाच वाजता विसर्ग 45 हजार क्युसेक करण्यात आला आहे. त्यामुळे मुठा नदीत आणखी पाणी आल्याने पुण्यातील सखल भागात पाणी घुसण्याची शक्यता आहे. सिंहगड भागामध्ये पाणी घुसले आहे. त्यामुळे पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) आपत्ती व्यवस्थापनाचे पथके सज्ज ठेवण्यात आली आहे. तर अडचणीच्या वेळी नागरिकांना संपर्क साधण्यासाठी महापालिकेने काही संपर्क क्रमांक जाहीर केलेत.

कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत, त्यांच्यापासून ओबीसी आरक्षणाला 100 टक्के धोका; आंबेडकरांचं मोठं विधान

दरम्यान पुण्याचे पूरपरिस्थीवर सरकारचे लक्ष आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडकवासला धरणातील पाणी सोडताना काळजी घेण्याचे सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. एकाच वेळी पाणी सोडण्यापेक्षा टप्पा-टप्पाने पाणी सोडावे. तसेच धरण क्षेत्रात जास्त पाऊस असल्याने धरणात जास्त पाणीसाठा ठेवू नये, अशा सूचना अजित पवार यांनी जलसंपदा विभागाला दिल्या आहेत. तर केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही प्रशासनाला सूचना दिल्यात.

मोठी बातमी! भारतीय संघ ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत दाखल, पेनल्टी शूटआऊटमध्ये निर्णय

संपर्क क्रमांक असे-
आपत्कालीन व्यवस्थापक कक्ष (मनपा भवन)-020-25501269, 020-25506800, 020-68801500
अग्निशामक विभाग-101, 020-26442101
सिंचन भवन पुणे क्रमांक-020-26127309, 020-26127062

क्षेत्रीय कार्यालये संपर्क क्रमांक
नगर रोड-020-25509000
येरवडा, कळस, धानोरी-020-25509100
ढोले पाटील-020-25597300
शिवाजीनगर, घोले रोड-020-25501500
औंध-बाणेर-020-25597100
कोथरुड-बावधन-020-25501600
वारजे-कर्वेनगर-020-25597700
सिंहगड रोड-020-29912301
धनकवडी, सहकारनगर-020-25508900
कोंढवा-येवलेवाडी-020-25508800
वानवडी-रामटेकडी-020-25506299
हडपसर-मुंढवा-020-25507449
भवानी पेढ-020-25597222
कसबा विश्रामबाग वाडा-20-25507600
बिबवेवाडी-020-25508700

follow us