Ravindra Dhangekar on Pune Crime : पुणे शहरातील गुन्हेगारी हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकताच पोर्शे कार अपघात प्रकरण चांगलच देशभरात गाजलं होतं. त्यानंतर ड्रग्ज, खंडणी, चोऱ्या, कोयता गॅँग अशा (Pune Crime) अनेक पातळ्यांवर या शहरातील गुन्हेगारी समोर आली आहे. आता हा विषय पुन्हा एकदा मारणे टोळीने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळल यांच्या जवळील व्यक्तीवर हल्ला केल्याने पेटला आहे. दरम्यान, काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय.
मारणे टोळीवर गुन्हा दाखल केला पण 2 एफआयआर केले, असं काय घडलं की एफआयआरमध्ये कलम वाढलं गेलं. यामध्ये कोण आहे चंद्रकांत दादा आहेत का? मोहोळ आहेत असा सवाल ही रवींद्र धंगेकर यांनी यावेळी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर निवडणुकीत हे (मारणे टोळी) कोणाचा प्रचार करत होते? दादांना जास्त मदत केली म्हणून हा त्रास आहे का? कि, मोहोळ यांना कमी मदत केली म्हणून हा त्रास आहे असा खोचकं प्रश्नही धंगेकरांनी उपस्थित केला आहे.
पण ते 16 फिक्सर अन् दलाल कोण?, राऊतांनी मुख्यमंत्र्यांना आव्हानही दिलं अन् अभिनंदनही केलं
दीपक मानकर हे देखील निवडणुकीच्या काळात जेलमधून बाहेर आले आणि थेट प्रचाराला लागले, ते कुणच्या आशीर्वादाने बाहेर आले? अशा गुन्हेगार लोकांचा निवडणुकीत राजकारणी फायदा करून घेतात, वापर करून घेतात. हे राजकारण आणि राजकारणी शोधायला पाहिजे. खरंच गुन्हा होता तर दुसरा एफआयआर का केला गेला? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. मारणे यांचे समर्थन नाही पण यात काहीतरी गौडबंगाल आहे. असा संशय ही रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला आहे. मी पुण्याचे पोलीस आयुक्त यांना पत्र लिहिले आहे आणि या सगळ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. आता ते खरंच कारवाई करतात का? का त्यांच्यावर सुद्धा कुणाचा दबाव आहे, हे पाहणं महत्वाचं आहे असंही ते म्हणाले आहेत.
जेव्हा माझ्या सर्वसामान्य पुणेकरांना गुंडांच्या या टोळ्या त्रास देतात तेव्हा याकडं सोयिस्कर दुर्लक्ष करणाऱ्या खासदारांनी स्वतःच्या ऑफिसमधील मुलाला मारहाण झाल्यानंतर मात्र अचानक आक्रमक भूमिका घेतली आहे. पुण्यनगरीच्या कायदा व सुव्यवस्थेबद्दल खासदारांनी खरंतर आत्मपरीक्षण करायला हवं. या गुंडांच्या टोळ्या आपणच पोसलेल्या आहेत. आपणच निवडणुकीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना धमकवण्यापासून तर पैसे वाटप करण्यापर्यंत या टोळ्यांचा वापर केला. आज याच गुंडांच्या टोळ्या माझ्या सर्वसामान्य पुणेकरांना सर्वत्र त्रास देत आहेत. फरक फक्त इतकाच आहे की, आज ते तुमच्या ऑफिस पर्यंत पोहचलेत म्हणून आपण जागे झालात असा टोलाही त्यांनी मोहळकर यांना लगावला आहे.