…पण ‘ते’ 16 फिक्सर अन् दलाल कोण?, राऊतांनी मुख्यमंत्र्यांना आव्हानही दिलं अन् अभिनंदनही केलं

  • Written By: Published:
…पण ‘ते’ 16 फिक्सर अन् दलाल कोण?, राऊतांनी मुख्यमंत्र्यांना आव्हानही दिलं अन् अभिनंदनही केलं

Sanjay Raut On Cm Fadanvis : संजय राऊतांना महाराष्ट्राच्या हितासाठी मुख्यमंत्र्यांना तसेच राज्याच्या मुख्य सचिवांना आवाहन केलंय. ते म्हणाले, कोणत्या मंत्र्यांनी आणि नेत्यानं ओएसडी आणि पीएची नावं पाठवली? अशा फिक्सरची नावं जाहीर करावी. (Sanjay Raut ) जे फिक्सर आणि दलाल आहेत ते सर्व लोक शिंदे गटाचे असल्याची माझी माहिती आहे असा थेट घणाघात राऊतांनी केलाय.

शिंदेच्या सेनेचे म्हणजेच अमित शहांच्या पक्षाचे हे लोक आहेत. या सर्व फिक्सरांची नावे शिंदेंच्या पक्षाकडून गेली. किंबहुना असे नसेल तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य प्रशासकीय प्रमुखांनी ही नावे जाहीर करावी, अन्यथा ही नावं मी जाहीर करतो, माझ्याकडे 16 जणांची नावे आहेत आहे. त्यातील 13 हे शिंदे गटाचे आहेत आणि उरलेले तीन हे अजित पवार यांच्या पक्षाचे असल्याचा दावा करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर घणाघाती टीका केली आहेत.

कुणाचा सत्कार करायचा, त्याची परवानगी घेऊ का ? शरद पवारांचा संजय राऊतांना टोला

गेल्या वेळी म्हटल्याप्रमाणे अजित पवार यांना त्यांच्या मर्यादा माहिती आहेत. मुख्यमंत्र्यांचे जे अधिकार आहेत त्यांचे ते पालन करतात. अजित पवार हे पाप धुवायला प्रयागराजला गेले नाहीत. त्यांना माहिती आहेत महाराष्ट्रात देखील अनेक नद्या आणि तीर्थक्षेत्र आहेत जिथे पाप धुता येतील. मात्र काही लोकांनी इतके पाप केले आहेत की त्या पापांचा कडेलोट झाला आहे, म्हणून ते प्रयागराजला गेले असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही टोला लगावला आहे.

फडणवीस यांचे आभार

या सर्वांचे फिक्सर होते आणि महाराष्ट्राचे संभाव्य नुकसान टाळल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार आणि अभिनंदन. आमच्यात जरी राजकीय मतभेद असले तरी राज्याच्या हितासाठी त्यांनी घेतलेले निर्णयाला आम्ही पाठिंबा देतो. असेही संजय राऊत म्हणाले.

एकनाथ शिंदे यांचासह अनेक नेत्यांचे गुन्हे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अक्षरशः पोटात घेतले. त्यावर आम्ही अनेकदा त्यांना सांगायचं की पुढे आपल्याला त्याचा त्रास होईल. शिंदेंच्या पक्षासोबत असलेले अनेकांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी भरभरून दिलं. त्यात आम्ही देखील असून आम्ही मात्र कृतघ्न आहोत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल एका मंत्र्याला दम देऊन सांगितलं आहे. यातील जी यादी आली त्यातील 16 जण हे दलाल आणि फिक्सर होते. कोणत्या मंत्र्यांनी ओएसडी आणि पीएची नावं पाठवली अशा फिक्सरची नावे जाहीर करावी. असे आवाहन माझे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे. असा पुनरुच्चारही संजय राऊत यांनी यावेळी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube