पुणे : अजितदादांची ग्रामीण राजकारणावर पकड आहे. पण अमोल कोल्हेंचे काय होईल हे भाकीत वर्तविणे योग्य नाही. मात्र एक सांगू शकतो की शिवाजीराव आढळराव पाटील यांची प्रतिमा आणि निवडणुकीत पडल्यानंतरही त्यांनी पाच वर्षात केलेले काम यामुळे वारे त्यांच्या दिशेने आहे. मात्र ती जागा कोण लढविणार, काय करणार याबाबत आमचे तिन्ही पक्षांचे नेते मिळून निर्णय घेतील, असे मत शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केले. ते पुण्यात बोलत होते. (Former Shiv Sena minister Vijay Shivtare comments on what will happen to Amol Kolhe in Shirur Lok Sabha constituency.)
2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत आव्हान विजय शिवतारे यांना आव्हान दिले होते. त्यानुसार विजय शिवतारे यांचा पुरंदर मतदारसंघात पराभव झाला होता. त्यानंतर आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनाही अजित पवार यांनी अशाच प्रकारचे आव्हान दिले आहे. याबाबतच विजय शिवतारे यांच्याशी लेट्सअप मराठीने खास संवाद साधला.
यावेळी बोलताना शिवतारे म्हणाले, अजितदादा आता महायुतीमध्ये आहेत. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीमध्ये नेते जे काही निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला पाळावाच लागेल. मात्र अजितदादांची ग्रामीण राजकारणावर पकड आहे. पण अमोल कोल्हेंचे काय होईल हे भाकीत वर्तविणे योग्य नाही. मात्र एक सांगू शकतो की शिवाजीराव आढळराव पाटील यांची प्रतिमा आणि निवडणुकीत पडल्यानंतरही त्यांनी पाच वर्षात केलेले काम यामुळे वारे त्यांच्या दिशेने आहे. मात्र ती जागा कोण लढविणार, काय करणार याबाबत आमचे तिन्ही पक्षांचे नेते मिळून निर्णय घेतील.
2019 च्या विधानसभा निवडणुकीची आठवण सांगताना शिवतारे म्हणाले, त्या काळात पक्ष वेगळा होता. पक्षाची माझ्यावर जबाबदारी होती. एक मर्यादा, एक लक्ष्मण रेषा असते. ती सोडून राजकारणात बाहेर जायचे नसते. पण पक्षासाठी ती सोडून मी बाहेर गेलो. त्याचा त्यांनाही राग आला होता. आता आम्ही एकत्रितपण लढून सर्व जागा जिंकू. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत अजितदादा मदत करणार का? असा सवाल विचारला असता ते म्हणाले, अजितदादा आता आमचे नेते आहेत आणि आम्ही कार्यकर्ते आहोत. आता नेत्याने कार्यकर्त्याच्या विजयासाठी प्रयत्न करायचेच असतात. त्याप्रमाणे ते माझ्या विजयासाठीही प्रयत्न करतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.