Download App

निवडणूक नागपूरमधूनच लढवणार, पण पुणे…; जेजुरीमध्ये फडणवीसांचं पुन्हा शिक्कामोर्तब

Devendra Fadanvis : ‘अजितदादा तुम्ही विविध योजनांबद्दल बोललात. मी तुम्हाला सिंचन मंत्री म्हणून अश्वस्त करू इच्छितो की, विविध सिंचन योजनांसह पुणे आणि पिंपरी मनपातील सांडपाण्यावर 100 टक्के प्रक्रिया करून ते पाणी उद्याोगांसाठी वापरू त्यामुळे उर्वरित पाणी सिंचनासाठी वापरता येईल आणि जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाचा प्रश्न मिटेल. तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी पुरंदर एअरपोर्टसाठी केंद्रसरकारने सर्व परवानग्या दिल्या आहेत. मी हात जोडून विनंती करतो. मी पुण्यातून नाही तर नागपूरमधूनच निवडणूक लढवणार आहे. पण पुण्याचा विकास करायचा असेल तर एअरपोर्ट आवश्यक आहे.’ असं फडणवीस म्हणाले. ते पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमावेळी बोलत होते. ( Fought elections in Nagpur not Pune says Devendra Fadanvis in Shasan Aaplya Dari Pune jejuri )

ज्यांचं पोट दुखतंय त्यांचाही इलाज.., ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमातून मुख्यमंत्री शिंदेंची टोलेबाजी…

आज पुणे पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. पुढे फडणवीस म्हणाले, काही दिवसांपूर्वी देवस्थानचा 350 कोटींचा विकास आराखडा मंजुर केला होता. आता त्यातील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज 109 कोटींच्या कामाची सुरूवात करण्यात आली आहे.

Video : आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा; सत्तेत आल्यानंतर दुसऱ्याचं दिवशी टोल बंद करणार

तसेच येत्या काळात या देवस्थानात येणाऱ्या भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध केल्या जातील. शासन आपल्या दारी या योजनेने लोकांना त्यांच्या घरापर्यंत लाभ पोहचवण्याचं काम केलं गेलं. शेतकऱ्यांना पेन्शन, विमा, यानंतर सौरउर्जा ही योजना दिली जाणार आहे. तसेच महिलांसाठी एसटीमध्ये अर्ध्या तिकीटामध्ये प्रवासाची सुविधा, बचत गटासाठी भांडवलं दुप्पट केले जाणार आहे.

तसेच त्यांनी पुढे लेक लाडकी योजनेबद्दल सांगितले, मुलीच्या जन्माने ते घर लखपती होणार आहे. असं फडणवीस म्हणाले. तसेच केंद्राच्या धर्तीवर आरोग्या योजनेमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत 5 लाखांपर्यंतचा इलाज मोफत केला आहे. त्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची अट ठेवण्यात आलेला नाही. अशा विविध योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Tags

follow us