Video : आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा; सत्तेत आल्यानंतर दुसऱ्याचं दिवशी टोल बंद करणार

  • Written By: Published:
Video : आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा; सत्तेत आल्यानंतर दुसऱ्याचं दिवशी टोल बंद करणार

Aditya Thackery On Mumbai Toll Collection : आमचं सरकार आल्यावर टोल बंद करणार अशी मोठी घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ही घोषणा करताना मुंबईतील टोल नाक्यावरील वसुली थांबवण्यात यावी असं आव्हान केलं आहे. यावेळी आदित्य यांनी भाजप आणि राज्य सरकार जोरदार हल्लाबोल केला.

Letsupp Special : अजितदादासोबत आले तरी, जयंत पाटलांसाठी भाजपचा आटापिटा का?

राज्य सरकारने MSRDC अंतर्गत असणारे पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरचे रस्ते मुंबई महापालिकेला हस्तांतरित केले आहेत. हे करताना या रस्त्यांच्या डागडुजीसाठी सर्व सामान्यांकडून टोल वसुली केल्याचा आरोप आदित्य यांनी केला. ही वसुली तात्काळ बंद करावी असे आव्हान केले. तसेच आमचं सरकार सत्तेत आल्यानंतर ही टोल वसुली दुसऱ्याचं दिवशी बंद करणार असल्याचे मोठे आश्वासन करोडो मुंबईकरांना आदित्य ठाकरेंनी दिले आहे.

आम्ही दोघेही एकच, दोन गट असल्याचा पुरावा नाही; शरद पवार गटाचे EC ला उत्तर

जाहिरातींचे पैसे BMC ला का देत नाही?

टोल वसुलीवरून राज्य सरकारला घेरताना आदित्य ठाकरेंनी राज्य सरकार आणि जाहिरातींच्या होर्डिंगचे पैसे BMC ला का देत नाही असा सवाल उपस्थित केला. तसेच या सर्व रक्कमेची वसुली राज्य सरकार MSRDC कडे कंत्राटदारांच्या हितासाठी करत आहे का? असा गंभीर प्रश्नदेखील विचारला. MSRDC चं मुंबईच्या रस्त्यांवर काही काडीमात्र काम नसल्य्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

चीनमध्ये फक्त दोनच तास फोन वापरण्याची परवानगी? कायदाच पारित होणार…

सरकारची डेड लाईन जवळ येत आहे

गेल्या काही दिवसांपासून सत्तेतील शिंदे सरकार घटनाबाह्य असल्याचे तसेच ते कोसळणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर भाष्य करताना अदित्य ठाकरे म्हणाले की, सत्तेतील सरकारची डेड लाईन जवळ येत असून, लवकरच नव्या सरकार उदय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube