Download App

पुण्यात FTII मध्ये झळकलं वादग्रस्त बॅनर, हिंदुत्ववादी संघटना अन् विद्यार्थ्यांमध्ये तुफान राडा

Clash in FTII : नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वाद (Clash in FTII) होत असलेल्या पुण्यातील एफटीआयआय (FTII) म्हणजेच फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेमध्ये आज पुन्हा एकदा दोन गटांमध्ये तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं. या मारहाणीचं कारण होतं एक वादग्रस्त बॅनर.

महिला आरक्षण फक्त गाजरच; भाजप नेत्यांचा ‘अर्धवट’ उल्लेख करत अंधारेंचा हल्लाबोल

एफटीआयआयमधील विद्यार्थी संघटनांकडून एक बॅनर लावण्यात आलं होतं. त्यावर आक्षेप घेत हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली. आज (23 जानेवारी) दुपारी ही घटना घडली. त्यानंतर पोलिसांनी मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे आता या संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Budget 2024 : गरीबांना अच्छे दिन! कर संकलनातून मिळालेला पैसा ‘या’ योजनांवर होणार खर्च

दरम्यान या वादग्रस्त बॅनरवर बाबरी मशिदीचा उल्लेख होता. ही गोष्ट हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना समजतात त्यांनी संस्थेच्या परिसरामध्ये घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली. त्यानंतर या परिसरातील वातावरण तापलं होतं. तर या वादानंतर संस्थेच्या आवारातून बाबरी मशिदीचा उल्लेख असलेला संबंधित बॅनर काढून टाकण्यात आलेला आहे.

शेअर बाजारात हाहाकार! मंगळवार ठरला अमंगल; सेन्सेक्स 1053 तर, निफ्टी 333 अंकांनी आपटला

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी एफटीआयआयमध्ये दीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. यावेळी विद्यार्थ्यांच्या एका गटाने या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला कडाडून विरोध केला. घोषणाबाजी केली. स्क्रीनिंगच्या विरोधात विद्यार्थ्यांनी मोठ आंदोलन उभं केलं. स्क्रीनिंगसुरू होण्याआधीच हा विरोध सुरू झाला होता.

follow us