पुण्यातील केंद्राच्या संस्थेत विद्यार्थ्यांचा राडा; केरला स्टोरीच्या स्पेशल स्क्रिनिंगवेळी हाणामारी

पुण्यातील केंद्राच्या संस्थेत विद्यार्थ्यांचा राडा; केरला स्टोरीच्या स्पेशल स्क्रिनिंगवेळी हाणामारी

FTII Students Aggressive on The Kerala Story Special Screening : सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) सिनेमाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या सिनेमावर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. काहींनी तर हा सिनेमा (Cinema) प्रपोगांडा असल्याचे सांगितले आहे. तर काही ठिकाणी या सिनेमावर बंदी देखील घालण्यात आली होती. त्यामध्ये आता पुण्यातील फिल्म अॅंड टेलिव्हिजन इन्स्टीट्युट ऑफ इंडिया ( FTII ) मध्ये या चित्रपटाला विरोधाला सामोर जाव लागलं आहे.

‘The Kerala Story’ सिनेमावरुन प्रकाश राज यांचा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल

एफटीआयआयमध्ये या चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. यावेळी विद्यार्थ्यांच्या एका गटाने या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला कडाडून विरोध केला. घोषणाबाजी केली. स्क्रीनिंगच्या विरोधात विद्यार्थ्यांनी मोठ आंदोलन उभं केलं. स्क्रीनिंगसुरू होण्याआधीच हा विरोध सुरू झाला होता. मात्र विद्यार्थ्यांचा विरोध झुगारत हे स्क्रीनिंग सुरूच ठेवण्यात आलंय या ठिकाणी दोन गटांमध्ये बाचाबची देखील झाली.

The Kerala Story: “खरे नाव बदलावे लागले…” प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

या पार्श्वभूमीवर एफटीआयआयच्या परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आज शनिवार 20 मे ला सकाळी 9 वाजता या चित्रपटाचं हे स्पेशल स्क्रिनिंग सुरू झालं होत. त्यादरम्यान एफटीआयआयमध्ये विद्यार्थ्यांचं शैक्षणिक कारणास्तव आंदोलनही सुरू होतं. मात्र एफटीआयआयमध्ये या चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आल्याने या आंदोलनाची दिशा बदलली.

दरम्यान बंगाल राज्यामध्ये या सिनेमावर घालण्यात आलेली बंदी न्यायालयाने उठवली आहे. ‘द केरला स्टोरी’ सिनेमाला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. हा सिनेमा पहिल्या दिवसापासूनच कोटींची कमाई करत आहे. या चित्रपटाने 15 दिवसांत 167.86 कोटींची मोठी कमाई केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube