Download App

VIDEO : सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली चुकीचा इतिहास दाखवला, शिर्के घराण्याचा छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकांवर आरोप

  • Written By: Last Updated:

Ganoji Shirke Relative Against Chhaava Film Directors : नुकताचा छावा (Chhaava) हा चित्रपट प्रदर्शित झालाय. या सिनेमात कान्होजी शिर्के आणि गणोजी शिर्के (Ganoji Shirke) हे दोन पात्प गद्दार असल्याचं दाखवण्यात आलंय. त्यांनी हिंदवी स्वराज्याशी विश्वासघात करत छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाच्या तावडीत दिलं. त्यामुळं संभाजी महाराजांना पकडण्यात मुघल यशस्वी झाल्याचं दाखवण्यात आलंय. या दृश्यांमुळे मात्र गणोजी शिर्के यांचे वंशज संतापल्याचं पाहायला (Chhaava Movie) मिळतंय. त्यांनी छावाच्या दिग्दर्शकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय.

यासंदर्भात पत्रकार परिषद घेत गणोजी शिर्के यांच्या नातेवाईकांनी छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. छावा चित्रपट प्रदर्शित करताना गणोजी शिर्के यांच्या घराण्याची बदनामी केलीय. त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. शिर्के घराण्याचे मुख्य वंशज, किल्ले धर्मवीरगड बहादुरगड संस्थानिक दीपक राजे शिर्के म्हणाले की, द्वेषापोटी, जाणीवपूर्वक हा षडयंत्र करून इतिहास बदलून मांडण्यात आलाय.

छाया कदम यांचा पुरस्कारांचा सिलसिला कायम; पुणे फिल्म फेस्टीवलमध्ये पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

तोडमोड करून इतिहासाला वेगळं वळण देण्यात आलंय. कोणताही ऐतिहासिक पुरावा नसताना राजे शिर्के घराण्यावर कार्य केलं गेलं, असा आरोप त्यांनी केलाय. त्यामुळं आम्ही राज्यभर आंदोलन उभं करणार आहोत. उतेकर आणि छावा कादंबरीच्या प्रकाशकांना पुरावे दाखवा अशी नोटीस दिली आहे. आमचं मत काय? यावर त्यांनी आमच्याशी चर्चा करायला हवी. आमचा सल्ला घेतला नाही, अशी देखील खदखद त्यांनी बोलून दाखवली. दिग्दर्शक उतेकर यांनी उत्तर द्यावं. अन्यथा महाराष्ट्रात त्यांना फिरू देणार नाही, त्यांनी चूक केली आहे असा इशारा दीपक राजे शिर्के यांनी दिलाय.

पेपर सुरू होताच प्रश्नपत्रिका केंद्राच्या बाहेर; जालना जिल्ह्यात दहावीचा पेपर फुटल्याने खळबळ

या चित्रपटात इतिहासाची तोडमोड केली आहे. जाणीवपूर्वक इतिहास बदलला आहे. आमच्या घराण्याला बदनाम केलं जातंय. षड्यंत्र करत बदनामी केली जात आहे. चुकीचा इतिहास दाखवला गेलाय. आमच्या राजे शिर्के घराण्याला टार्गेट केलं गेलंय. त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाही. छावा कादंबरी ज्यांनी लिहिली, त्यांची देखील भेट आम्ही घेतली होती. राजे शिर्के घराण्याचं खूप मोठ योगदान आहे. आम्ही गद्दारी केली, असे कुठलेही पुरावे उपलब्ध नाही. मग हे आरोप कसे केले जातात? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

इतिहास गायब केला जातोय. समाजात तेढ निर्माण केली जात आहे. आम्ही चित्रपटाच्या विरोधात नाही. मात्र, खलनायक चुकीचा दाखवला आहे. गणोजी राजे शिर्के यांनी वाट दाखवली नाही.  लक्ष्मण उतेकर यांनी चुकीचा इतिहास दाखवला आहे. सिनेमॅटिक लिबिरीटीच्या नावाखाली चुकीचा इतिहास दाखवला गेलाय, असा आरोप शिर्के घराण्याने छावा चित्रपटांच्या दिग्दर्शकांवर केलाय.

follow us