Download App

गणपती विसर्जनाची धामधूम अन् पुण्यातील ‘या’ भागात गोळीबार

Phoenix Mall : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. गेल्या चार दिवसात पुण्यात (Pune) गोळीबाराच्या दोन घटना

  • Written By: Last Updated:

Phoenix Mall : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. गेल्या चार दिवसात पुण्यात (Pune) गोळीबाराच्या दोन घटना घडल्याने पुण्यात  कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यातच गणपती विसर्जनादिवशी (Ganpati Visarjan) देखील पुण्यात हवेत गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे.

माहितीनुसार या गोळीबारात कोणीही जखमी झालेला नाही मात्र अचानक झालेल्या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमध्ये मुंबई- बंगळुरु हायवे लगत असलेल्या फिनिक्स मॉलच्या गेट नंबर 7 वर अज्ञात व्यक्तीन हवेत गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर आरोपी पसार झाले असून पोलीस त्यांच्या शोध घेत आहे.

सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास मॉलच्या गेट नंबर 7 समोरील विकास आराखड्यातील रस्त्यावर एका व्यक्तीने हवेत गोळीबार केल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत माहिती मिळताच वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिली.

वाळू व्यावसायिकावर गोळीबार

तर दुसरीकडे 16 सप्टेंबर रोजी कोंढव्यातील साळवे नगरमध्ये एका वाळू व्यावसायिकावर गोळीबार घडल्याची घटना घडली होती. कोंढवा गंगाधाम रोड येथील श्री दत्त वाळू सप्लायर्सचे दिलीप गायकवाड (Dilip Gaikwad) यांच्यावर साळवे नगरमध्ये गोळीबार करण्यात आला होता.

Pagers Exploded : लेबनॉनमध्ये पेजरचा स्फोट, राजदूतासह हिजबुल्लाहचे 1000 सदस्य जखमी

दिलीप गायकवाड यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तरुणांनी दोन ते तीन गोळ्या झाडल्या होत्या. या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना ताब्यात देखील घेतला आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने पुण्यात कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

follow us