Download App

तरुणांना कर्जबाजारी केलं, चोऱ्या करायल्या लावल्या; BMWत माज दाखवणाऱ्या गौरवचे कारनामे

Gaurav Ahuja- गौरव आहुजा हा अनेक वर्षांपासून क्रिकेट बेटिंग करतो. त्याच्याविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे.

  • Written By: Last Updated:

Gaurav Ahuja and Manoj Ahuja Criminal History: पुण्यातील वर्दळीच्या शास्त्रीनगर चौकात मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणाने आपल्या बीएमडब्बू कारमधून बाहेर येत सिग्नलवरच लघुशंका केली. तसेच त्याला हटकविणाऱ्या व्यक्तींकडे बघून त्याने पॅण्ट काढत अश्लिल हावभाव केले, तसेच महिलांकडे बघून अश्लिल हावभाव केले आहे. घटनास्थळी असलेल्या एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास करत गौरव आहुजा व त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. त्याचा मित्राला पोलिसांनी ताब्यात गेले आहे. तर गौरव आहुजाने (Gaurav Ahuja) एक व्हिडिओ जारी करत माफी मागितली आहे. तसेच आठ तासांत पोलिसांसमोर (pune Police) शरण येणार असल्याचे त्याने म्हटले आहे. रस्त्यावर अश्लिल वर्तन करणाऱ्या गौरव आहुजा याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. तसेच त्याचे वडिल मनोज आहुजाविरोधात (Manoj Ahuja ) गुन्हे दाखल आहेत.

Sanjay Kakade: माजी खासदार संजय काकडेंच्या पत्नी रुग्णालयात, अन्नातून विषबाधा झाल्याने प्रकृती खालावली

गौरव आहुजा हा अनेक वर्षांपासून क्रिकेट बेटिंग करतो. त्याच्याविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे. त्यावेळी तो अवघ्या वीस वर्षांचा होता. त्याचबरोबर त्याच्याविरोधात 2021 मध्ये जुगार आणि अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. कुख्यात गुंड सचिन पोटेच्या टोळीबरोबर गौरव हा बेटिंग जुगार करत होता. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणांना तो जाळ्यात ओढत होता. कर्जबाजारीपणामुळे अनेक तरुणांनी आपल्या घरांमध्ये चोऱ्या केल्या होत्या. गौरवच्या सांगणाऱ्यावरून हे तरुण आपल्याच घरात चोऱ्या करत होते. ते पैसे गौरव त्यांच्याकडून घेत होता. त्या पैशातून आहुजा यांनी कोट्यवधी रुपये कमविल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी गौरव आहुजा याच्यासह सचिन पोटे, अजय शिंदे, सनील मखिजा यांनी अटक झाली होती. त्यानंतर जामिनावर ते बाहेर आले आहेत.

..त्याने सिग्नलवर नाही माझ्या तोंडावर लघुशंका केली; मुलाच्या लाजिरवाण्या कृत्यानंतर वडिलांना पश्चाताप

वडिलांबरोबर मुलगाही जुगारात
पोकर गेम, क्रिकेट सामन्यांचे बेटिंग, मटक्याचा व्यवसाय असे जुगाराचे धंदे वडिल व मुलगा करत होता. आहुजाचा हॉटेल व्यवसाय आहे. पुण्यातील स्वारगेट भागात आहुजाचे क्रीम अॅण्ड कीचन या नावाने हॉटेल आहे. गौरव आहुजा हा व्यसनाच्या आहारी गेलेला आहे.

follow us