​पुण्यात TCS चा भव्य जॉब फेअर; ६ जुलैला जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये प्लेसमेंट ड्राईव्ह

TCS Job Fair at Jadhavar Group of Institutes यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य 'टॉक पूल कॅम्पस ड्राईव्ह'चे आयोजन करण्यात आले आहे.

TCS Job Fair At Jadhavar Group Of Institutes

TCS Job Fair At Jadhavar Group Of Institutes

Grand TCS Job Fair in Pune; Placement Drive at Jadhavar Group of Institutes : पुण्यातील नामांकित ‘जाधवराव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’ (Jadhavar Group of Institutes) आणि ‘टीसीएस’ (Tata Consultancy Services – TCS) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ‘टॉक पूल कॅम्पस ड्राईव्ह’चे (TCS Pool Campus Drive) आयोजन करण्यात आले आहे. हा जॉब फेअर सोमवार, ६ जुलै २०२६ रोजी सकाळी ८:३० वाजल्यापासून नर्‍हे येथील कॉलेज कॅम्पसमध्ये सुरू होणार आहे.

आता जनआरोग्य योजनेवर एआय ठेवणार वॉच, अनेक गैरप्रकार उडकीस आणल्याचा मंत्र्यांचा दावा

​या प्लेसमेंट ड्राईव्हच्या माध्यमातून बँक ऑफिस ऑपरेशन्स BPS (Business Process Services) अंतर्गत ‘ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग’ (Transaction Processing) या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

​पात्रता आणि निकष :
​शिक्षण: २०२४, २०२५ आणि २०२६ मध्ये उत्तीर्ण झालेले Full-time B.Com, BA, BBA, BBM, BMS, BAF, BBI आणि B.Sc (फक्त CS आणि IT वगळून) चे विद्यार्थी पात्र आहेत.

राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या रकमेबाबतचा तपशील समोर

​अनुभव: फ्रेशर्स (0 अनुभव) ते ६ महिन्यांपर्यंतचा कामाचा अनुभव असलेले उमेदवार.
​वयोमर्यादा: १८ ते २८ वर्षे.
​इतर अटी: शैक्षणिक गॅप २ वर्षांपेक्षा जास्त नसावा. पदव्युत्तर शिक्षण (Post-graduation) घेत असलेले किंवा पूर्ण झालेले उमेदवार यासाठी पात्र नाहीत. तसेच उमेदवाराचा कोणताही बॅकलॉग (Backlog) नसावा आणि गेल्या ९० दिवसांत टीसीएसच्या कोणत्याही ड्राईव्हला उपस्थित राहिलेले नसावे.

​आवश्यक कागदपत्रे :

​मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी अद्ययावत रिझ्युमे (Updated Resume), सरकारी ओळखपत्र (Government ID Proof), मूळ शैक्षणिक कागदपत्रे आणि टीसीएसचा ॲप्लिकेशन फॉर्म सोबत आणणे आवश्यक आहे. (फॉर्मवरील नाव, जन्मतारीख ही आधार कार्डशी जुळणारी असावी).

​निवड प्रक्रिया (Selection Process) :
​उमेदवारांची निवड ही प्रामुख्याने ॲप्टिट्युड टेस्ट (Aptitude Test) आणि मुलाखती (Interview) याद्वारे केली जाईल. प्रत्येक टप्पा यशस्वीपणे पार पाडणाऱ्या उमेदवारांना पुढील प्रक्रियेसाठी निवडले जाईल.

​जॉब फेअरचा तपशील :
​दिनांक: सोमवार, ०६ जुलै २०२६
​वेळ: सकाळी ८:३० वाजल्यापासून
​स्थळ: डॉ. सुधाकरराव जाधवराव आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, कॅम्पस- २, राम मंदिराजवळ, मनाजीनगर, नर्‍हे, पुणे – ४१.
​संपर्क क्रमांक: +९१ ९३५६३ ९९६२९ / +९१ ९२७०७ ९८५९०
​इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत लिंकवर (https://nextstep.tcsapps.com/indiacampus/#/) जाऊन ‘BPS’ कॅटेगरी अंतर्गत आपली नोंदणी करणे अनिवार्य आहे.

 

Exit mobile version