Download App

हर्षवर्धन पाटील-पवारांमध्ये पुण्यात अडीच तास खलबतं; ‘तुतारी’ चा प्रश्न येताच घेतलं फडणवीसांचं नाव

Harshvardhan Patil : राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीच्या घोषणा होणार आहे. त्यापूर्वी राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी

  • Written By: Last Updated:

Harshvardhan Patil : राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीच्या घोषणा होणार आहे. त्यापूर्वी राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. काही नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाताना दिसत आहे. यातच गेल्या काही दिवसांपासून भाजप (BJP) नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) पक्षावर नाराज असून येत्या काही दिवसात शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे.

आज (27 ऑगस्ट) रोजी हर्षवर्धन पाटील यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (Vasantdada Sugar Institute) शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये शरद पवार यांची भेट घेतल्याने माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, दर तीन महिन्याने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गर्व्हनिंग कौन्सिलची बैठक होत असते. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट शेतकऱ्यांसाठी काम करणारी एक मोठी संघटना आहे असून या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आहे. आजच्या बैठकीत बरेच विषय होते, मध्य काळात निवडणुका असल्याने बैठक झाली नव्हती त्यामुळे बरेच विषय प्रलंबित होते.

तसेच महाराष्ट्रा आणि देशातला ऊस उत्पादक शेतकरी यांच्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याचा काम ही संस्था करत आहे आणि या बैठकीत कुठलीही राजकीय चर्चा झाली असं माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले.

माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले की, आज मी आणि पवार साहेब अडीच – तीन तास एकत्र होते मात्र आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही आणि मला याबाबत कोणीही काही बोललेलं नाही असं देखील ते यावेळी म्हणाले. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) काय बोलले हे मला माहिती नाही, माझ्याकडून तरी अशी कुठलीही भूमिका इतर पक्षांत जाण्याची झालेली नाही आणि माझा कुणी संपर्क साधला नाही असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

तसेच सध्या राज्यात अजित पवार यांचे जे दौरे सुरु आहे त्यात ज्या तालुक्याचा जो आमदार असेल त्या पक्षाला ती जागा मिळणार असं बोललं जात आहे, त्यामुळे साहजिक माझ्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा खूप आग्रह आहे आणि लोकशाहीत प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार असतो.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी माझी, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाली होती त्यावेळी अजित पवार म्हणाले होते, इंदापूरबाबतीत फडणवीस जो निर्णय घेणार तो मला मान्य असेल आणि फडणवीस यांनी देखील मी इंदापूरबाबतीत निर्णय घेईन असं म्हटलं होते त्यामुळे आम्ही वाट बघत आहो की फडणवीस काय निर्णय घेणार असं देखील हर्षवर्धन पाटील म्हणाले.

जनतेचा जो आग्रह आहे आमच्या पक्षातील नेतृत्वापर्यंत पोहचला असून आता वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतो हे आता बघू. सध्या तरीही महायुतीमध्ये जागावाटपाबात निर्णय झालेला नाही.

“..तर मग सगळंच संपेल”; पुतळा उभारणाऱ्या ‘त्या’ तरुणाला कोणती भीती?

लोकसभेत आम्ही अजित पवार यांचा काम केला होता त्यामुळे महायुतीमध्ये जी चर्चा झाली होती त्याप्रमाणे निर्णय घ्यावा असा माझा आग्रह आहे असेही यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले.

follow us