पंतप्रधानांच्या प्रसिद्धीचा दिखावा नडला अन् शिवरायांचा पुतळा कोसळला; शरद पवार गट भाजपवर संतापला
Shard Pawar Group ON BJP : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी मागील वर्षी नौदल दिनाचं औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या 35 फुटी पूर्णाकृती पुतळ्याचं (Chatrapati shivaji maharaj statue) अनावरण केलं. मागील वर्षी 4 डिसेंबर 2023 रोजी दिमाखात मोदी यांनी सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. या अनावरणासाठी महायुतीच्या सर्वच नेत्यांनी नियोजन केलं होतं.
पंतप्रधानांच्या प्रसिद्धीचा दिखावा नडला..
राजांचा पुतळा नव्हे, महाराष्ट्रधर्म पडला..!!आपल्या प्रसिद्धीच्या दिखाव्यासाठी वेळ आणि कामाच्या दर्जाला दुय्यम स्थान देणाऱ्या नरेंद्र मोदींच्या नीतीचा राम मंदिर आणि संसद भवनानंतर महाराष्ट्राच्या अस्मितेलाचं फटका…!! नौदल दिनी… pic.twitter.com/dLt9G8SEVi
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) August 26, 2024
अनावरणानंतर पुतळ्याचं काम प्रगतीपथावर होतं, मात्र, अचानक पुतळा कोसळल्याची घटना घडलीयं. या घटनेवरुन विरोधकांनी काही संधी सोडली नाही. एकीकडे कॉंग्रेस तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेश शरद पवार गटाने भाजपला चांगलच फैलावर घेतलंय. पंतप्रधानांच्या प्रसिद्धीचा दिखावा नडला, राजांचा पुतळा नाही, महाराष्ट्र धर्म पडला, असल्याचा संताप शरद पवार गटाकडून व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात शरद पवार गटाने एक्सवर पोस्ट शेअर केलीयं.
दोन वर्षात फक्त गद्दारांची प्रगती झाली; महाराष्ट्र वाऱ्यावर सोडला, पैठणमधून आदित्य ठाकरेंचा घणाघात
शरद पवार गटाने पोस्टमध्ये म्हटलं, “तप्रधानांच्या प्रसिद्धीचा दिखावा नडला.. राजांचा पुतळा नव्हे, महाराष्ट्रधर्म पडला..!! आपल्या प्रसिद्धीच्या दिखाव्यासाठी वेळ आणि कामाच्या दर्जाला दुय्यम स्थान देणाऱ्या नरेंद्र मोदींच्या नीतीचा राम मंदिर आणि संसद भवनानंतर महाराष्ट्राच्या अस्मितेलाचं फटका…!! नौदल दिनी पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला..!!” असल्याचं पोस्टमध्ये स्पष्ट करण्यात आलंय.
शिवरायांचा पुतळा कोसळल्याने विरोधकांकडून टीकेची झोड उठवण्यात येत आहे. शिवरायांचा पुतळा निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कोसळला आहे. सहा महिन्यांपूर्वीच पुतळा उभारण्यात आला. पुतळ्याचं काम सुरु असताना स्थानिक लोकांकडून पुतळ्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामासंदर्भात अनेकदा तक्रारी करण्यात आल्या पण या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं असल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केलायं.
नौदलाच्या गणवेशावर छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा असणार अशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनानिमित्त केली होती. याचं दिवशी त्यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं.