Download App

Tanaji Sawant : भुजबळांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सावंतांचं सेफ उत्तर; म्हणाले, प्रत्येक समाजाला..

Tanaji Sawant : राज्यात आरक्षणावरून मराठा समाज (Maratha Reservation) आणि ओबीसींमध्ये जोरदार संघर्ष सुरू झाल्याचे दिसून येत आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शविला आहे. सरकार मराठा समाजाला पाठीमागील दाराने ओबीसी आरक्षण देत असल्याचे भुजबळांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यावरून विरोधकांकडून टीका होत आहे. त्यांच्या या भूमिकेवर आता आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी हातचा राखत भाष्य केले आहे. भुजबळ यांची जी काही भूमिका आहे ती ते मांडतील असे सांगत सावंत यांनी या मुद्द्यावर सविस्तर बोलणे टाळले. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना छगन भुजबळ यांच्या सध्याच्या भूमिकेबाबत विचारले. त्यावर मंत्री सावंत यांनी ‘सेफ’ उत्तर दिले.

Maratha Reservation : पत्रकारांची प्रश्नांची सरबत्ती; चिडलेल्या सावंतांचा ‘मविआ’वर घणाघात 

सावंत म्हणाले, भुजबळ यांची जी काही भूमिका आहे ती भुजबळ मांडतील. त्यांच्या समाजाचं नेतृत्व ते करतात. जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाला आपापला विचार आहे. लोकशाही आहे. प्रत्येक समाजाला अस्तित्व आहे. तुम्हाला आठवत असेल 2019 मध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत आम्ही काय केलं हे सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर धनगर आरक्षणासाठी सुद्धा मी पुढाकार घेतला होता.

उद्धव ठाकरे यांच्यासमवेत धनगर समाजबांधवांना घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलो. त्यावेळी ‘धनगर’ आणि ‘धनगड’ हा जो काही शब्दांचा तिढा चालला होता. त्या पद्धतीचं एक अॅफेडेव्हिट सरकारतर्फे कोर्टात द्यायला लावलं. ती केसही अजून चालू आहे. याचा अर्थ मी फक्त मराठा समाजासाठीच काम करतो असा नाही. ज्या समाजावर अन्याय होतो. त्यांना त्यांच्या चौकटीत जे काही मिळणं गरजेचं आहे ते मिळालंच पाहिजे. मी या समाजाचा आहे म्हणून मी माझंच सांगत बसणार मग दुसऱ्या समाजावर अन्याय झाला तरी चालेल या मानसिकतेचे आम्ही नाही. ज्याच्या त्याच्या चौकटीत राहून जे जे हक्काचं आहे ते त्यांना मिळालंच पाहिजे. कुणावरही अन्याय होता कामा नये या मताचा मी आहे, अस सावंत यांनी सांगितले.

Maratha Reservation: सरकार म्हणून भूमिका की वैयक्तिक? भुजबळ, देसाईंच्या विधानावरून वडेट्टीवारांचा सवाल

 

follow us