पुणे : विमाननगरमधील फिनिक्स मार्केटसिटी अर्थात फिनिक्स मॉलच्या (Phoenix Mall) तिसऱ्या मजल्यावर आज (दि.19) दुपारी तीनच्या सुमारास भीषण आगा लागली होती. यानंतर सुरक्षेसाठी संपूर्ण मॉल रिकामा करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले. या घटनेत सुदैवाने जिवीत वा कुणीही जखमी झालेले नाही. (Pune Viman Nagar Fire Update )
याबाबत अधिक माहिती अशी की, दुपारी तीन ते साडे तीन वाजण्याच्या सुमारास मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरील हॉटेलला आग लागल्याची वर्दी मिळाली. त्यानंतर वर्दी मिळताच अग्निशमन दलाकडून 5 फायरगाड्या 2 वॉटर टँकर व एक ब्रॉन्टो रवाना करण्यात आल्या होत्या. मॉलमध्ये तिसरया मजल्यावर रेस्टॉरंटमध्ये आग लागून मोठ्या प्रमाणात धुर निर्माण झाला होता. सदर रेस्टॉरंट हे कोविडनंतर पूर्णपणे बंद होते. जवानांनी तातडीने आगीवर नियंञण मिळवले असून धोका टाळला
सद्यस्थितीत कुलिंग ऑपरेशन सुरू ठेवत आग पुर्ण विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सुदैवाने अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने जखमी वा जिवितहानी झालेली नसून, आग नेमकी कशी लागली याबाबत कोणतेही कारण समजू शकले नाही. अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 40 ते 50 जवान आणि 6 अग्निशमन अधिकारी यावेळी घटनास्थळी उपस्थित होते.