Pune Loksabha : तिकीट कापलं तरीही मुळीकांचा मुरली आण्णांना सपोर्ट, म्हणाले..,
Pune Loksabha Election : मी काय किंवा मुरलीधर आण्णा काय आमच्या सर्वांसाठी फक्त कमळ हाच उमेदवार असल्याचं म्हणत भाजपचे नेते जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनाच सपोर्ट असल्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान, पुणे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर वडगाव शेरीत आज आयोजित मेळाव्यात जगदीश मुळीक बोलत होते. यावेळी पुणे भाजपचे अनेक दिग्गज नेते मेळाव्याला उपस्थित होते.
टायगर श्रॉफने खिलाडीला बनवले एप्रिल ‘फूल’! बडे मियाँसोबत केला असा प्रँक, पाहा व्हिडिओ
पुढे बोलताना जगदीश मुळीक म्हणाले, अन्य पक्षांप्रमाणे आमच्या पक्षातील निवडणुकीत उमेदवारीसाठी स्पर्धा, चुरस असते. पक्षाची उमेदवारी फक्त एकालाच मिळते. पण भारतीय जनता पक्षात उमेदवारीसाठीही चुरस असते. पण उमेदवाराच्या नावाची घोषणा झाल्यानंतर मी काय किंवा मुरलीधर आण्णा काय आमच्या सर्वांसाठी फक्त कमळ हाच उमेदवार असतो. त्याच्या विजयासाठीच सर्वजण प्रयत्न करतो. यावेळीही माझ्यासह आपण सर्वांनी सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्य देण्यासाठी पुढील सर्व दिवस कार्यरत राहू’, असे आवाहन माजी आमदार, भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केले आहे.
तसेच ही निवडणूक देशासाठी फार महत्वाची आहे. कारण आपण सन २००४ ते २०१४ काँग्रेस-युपीएचे सरकार आणि २०१४ ते २०२४ भाजपचे एनडीएचे सरकार देशात बघितले आहे, अनुभवले आहे. गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने देशात विकासाची कामे केली. पण कोणीही विरोधक भ्रष्टाचाराचा आरोप करू शकत नाही. या उलट सर्वसामान्य व्यक्तींशी सहजपणे संवाद साधणारा पंतप्रधान देशवासीयांनी प्रथमच बघितला. काय करणार यापेक्षा काय केलं, हे सांगणारे सरकार मोदी यांनी दिले असल्यानेच त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी देशवासी उत्सुक आहेत. त्यात आपण वडगावशेरीतील सर्वांनी आपला वाटा उचलूयात आणि कमळ फुलवत मुरलीधर मोहोळ यांनी प्रचंड मताधिक्याने दिल्लीत पाठवू या’ असंही ते म्हणाले.
मुरलीधर मोहोळांच्या रुपात एक चांगला उमेदवार – आमदार टिंगरे
वडगाव शेरी आणि नगर रोड परिसरातील नागरीकांसाठी भामा आसखेडमधून पाणीपुरवठा करणार, असे आम्ही ऐकत होतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विषयाला चालना दिली. एक गोष्ट सांगितलीच पाहिजे की महापौर म्हणून मुरलीधर मोहोळ हेसुद्धा यासाठी किती आग्रही होते, हे मी बघितले आहे. जनहिताच्या प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्न करणारा एक चांगला उमेदवार आपल्याला त्यांच्या रूपाने मिळालेला आहे. ते निवडून येतीलच, पण आता त्यांनाजास्त मताधिक्य देणे ही माझ्यासह आपली सर्वांची जबाबदारी असल्याचं आमदार सुनिल टिंगरे यांनी स्पष्ट केलं आहे.
Loksabha election : घनश्याम शेलारांची बीआरएसची मोटार लोकसभेत धावणार ?
मी एक कार्यकर्ता आहे. आमच्यासाठी देश सर्वप्रथम, नंतर पक्ष असतो. पुण्यात विकासाला मोठा निधी मिळू शकतो आणि पुण्याचा महापौर म्हणून काम करताना विकासाची सर्वाधिक संधी ही वडगावशेरी मतदारसंघात आहे, असे माझे मत आहे. त्यामुळे या परिसरात मेट्रोचे विस्तारीकरण, आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि त्यासाठीच्या पायभूत सुविधा विकसित करण्यासाठी माझे प्राधान्य असेल. आपले यावेळचे एक बहुमोल मत हे भाजपला नाही तर आपले एक मत हे राष्ट्रासाठी द्यावयाचे आहे. त्यामुळे आपण सर्वानीच जास्तीतजास्त मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याचा संकल्प आज करूयात, असं पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.
या आयोजित मेळाव्यात आमदार सुनील टिंगरे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, राजेंद्र जासुद, राजेद्र कंद, नानासाहेब आबनावे, आबासाहेब सोनावणे, राहुल पाचरणे, संदीप सोनावणे, राहुल भंडारे, सचिन पलांडे, रोहित खैरे, केशव पाचरणे, संतोष भरणे, सचिन सातपुते, अनिल नवले यांच्यासह तरूण मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित होते.