Video : पुण्यात टिंबर मार्केटमध्ये भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाचे 30 बंब

Video : पुण्यात टिंबर मार्केटमध्ये भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाचे 30 बंब

Pune Fire : पुण्यातील भवानी पेठ येथील टिंबर मार्केट मधील लाकूड साहित्याच्या सात ते आठ गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. तर या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टिंबर मार्केट येथील रामोशी गेट जवळ असलेल्या लाकूड सामान असलेल्या सात आठ गोडाऊनला पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमाराम भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये गोडाऊन मधील लाकडांचे सर्व साहित्य जळून खाक झाले असून अद्यापही आग सुरुच आहे.

भवानी पेठ येथील टिंबर मार्केट येथे लाकूड सामान असलेल्या गोडाऊनची भीषण आग अद्याप सुरु असून शेजारील चार घरांनाही आगीची झळ बसली आहे. जवानांनी आग वस्तीमध्ये आणि शेजारील शाळेमध्ये पसरु दिली नाही. या घरातील सुमारे 10 सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा धोका टळला असून अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. जखमी वा जिवितहानी नाही.

मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्यासमवेत इतर 20 अधिकारी व जवळपास 100 जवान आणि पुणे मनपा- पुणे कॅन्टोमेंट – पीएमआरडीए – पिंपरी चिंचवड अग्निशमन दल अशी एकुण जवळपास 30 अग्निशमन वाहने व खाजगी वॉटर टँकर दाखल आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्यापपर्यत समजू शकले नसल्याचे सांगण्यात आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube