Download App

पूजा खेडकरने सगळ्यांनाच कोर्टात खेचलं; UPSC पासून राज्य सरकापर्यंत एकालाही नाही सोडलं

युपीएससीच्या निर्णयाविरोधात पूजा खेडकर हिने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतलीयं. युपीएससीसह राज्य सरकारविरोधात याचिका दाखल केलीयं.

Pooja Khedkar News : युपीएससीने (UPSC) उमेदवारी रद्द केल्यानंतर पूजा खेडकर (Pooja Khedkar) हिने राज्य सरकारसह केंद्रीय लोकसेवा आयोगाला न्यायालयात खेचलंय. खोटे प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी पूजा खेडकरला केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीशीनंतर पूजा खेडकरची केंद्रीय समितीमार्फत चौकशी करण्यात आली. प्राथमिक चौकशीअंती पूजा खेडकरची युपीएससी उमेदवारी रद्द करण्यात आलीयं. त्यामुळे आता पूजा खेडकर हिने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत राज्य सरकारसह केंद्रीय लोकसेवा आयोग, नोटीस पाठवणाऱ्या संस्थांविरोधात रीट याचिका दाखल केलीयं.

Horoscope Today : आजचे राशी भविष्य, मिथुन राशीच्या लोकांना नोकरीत बदल करण्यासाठी योग्य दिवस

केंद्रीय लोकसेवा आयोगाने वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. नागरी सेवा परीक्षा-2022 या नुसार नियमांचे उल्लंघन प्रकरणात खेडकर दोषी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. एवढेच नव्हे तर, पूजा खेडकर यांना भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडीवरही बंदी घातली आहे. त्यामुळे पुजा खेडकरसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यूपीएससीने पूजा खेडकर यांच्या 2009 ते 2023 या काळातील सर्व रेकॉर्ड तपासल्यानंतर ही कारवाई केली आहे.पूजा खेडकर यांना 30 जुलैपर्यंत उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता. त्यांचे उत्तर न मिळाल्याने यूपीएससीने ही कारवाई केलीयं.

राज ठाकरेंचा आजपासून महाराष्ट्र दौरा; मराठवाड्यावर विशेष फोकस, सर्व जिल्ह्यांना देणार भेटी

नेमकं प्रकरण काय?
सुरुवातीला पूजा खेडकर या केवळ त्यांच्या वागणुकीमुळे चर्चेत आल्या होत्या. स्वतःच्या खाजगी ऑडी गाडीवर अंबर दिवा लावल्याचे फोटो सोशल मिडीयात व्हायरल झाले. याची जोरदार चर्चा झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राज्य शासनाला लिहिलेले पत्र समोर आले. त्यातून हे प्रकरण केवळ ऑडी गाडी पुरतेच मर्यादित नसल्याचे स्पष्ट झाले.

काँग्रेसमध्ये वेगवान हालचाली; जागावाटपासाठी आज मॅरेथॉन बैठका, पवार-ठाकरेंच्या खेळीने अस्वस्थता

या पत्राप्रमाणे, खेडकर यांची ऑफिसमधील वागणूकही राजेशाही होती. स्वतंत्र केबिनची, गाडीची, बंगल्याची आणि शिपायाची मागणी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती. जिल्हाधिकारी बाहेर गेले असताना, त्यांनी वरिष्ठांचे अँन्टी चेंबर बळकावल्याचेही समोर आले होते. त्यांच्या या वागणुकीवर बेशिस्तपणाचा ठपका ठेवत दिवसे यांनी पत्र लिहून खेडकर यांच्या बदलीची मागणी केली.

follow us