राज ठाकरेंचा आजपासून महाराष्ट्र दौरा; मराठवाड्यावर विशेष फोकस, सर्व जिल्ह्यांना देणार भेटी

राज ठाकरेंचा आजपासून महाराष्ट्र दौरा; मराठवाड्यावर विशेष फोकस, सर्व जिल्ह्यांना देणार भेटी

Raj Thackeray Election Visit : लोकसभेला फक्त नरेंद्र मोदींच्या नेतृत्वासाठी म्हणत बिनशर्त पाठिंबा दिलेले मनसे प्रमुख राज ठाकरे विधानसभा मात्र, एकला चलोच्या मुडमध्ये असल्याचं चित्र सध्यातरी दिसत आहे. राज ठाकरे यांनी आता निवडणुकीचं रणशिंग मराठवाड्यातून फुंकलं असल्याचं पाहायला मिळतय. कारण (Raj Thackeray)  राज ठाकरे ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार असून त्याचा नारळ मराठवाड्यातू फुटणार आहे.

Video: संख्याबळ आणि भाजपचं संघटन पाहून विधासभेला जागा मिळाव्यात, राम शिंदेंची सूचक प्रतिक्रिया

मराठवाडा फोकस

राज्यातील एकूण राजकीय परिस्थिती पाहता 224 जागांवर मनसे आपले उमेदवार उभे करणार असल्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केलं होतं. तसंच काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी लवकरच ते स्वतः दौरा करणार असल्यासही सांगितलं होतं. त्यानुसार राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा सुरू झालेला आहे. सोलापूरनंतर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांवर फोकस करणार आहेत. त्यामध्ये धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, जालना आणि संभाजीनगर या जिल्ह्यांमधील पक्षीय बलाबलचा राज ठाकरे स्वतः आढावा घेणार आहेत.

जिल्ह्याचा आढावा

पुण्यात पूरग्रस्त नागरिकांशी राज ठाकरे पुन्हा एकदा चर्चा करणार असल्याचीही माहिती समोर आली होती. त्यानंतर सोलापूर, धाराशिव, नांदेड ,लातूर, हिंगोली, परभणी, बीड जालना ,संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये राज ठाकरे दौरा करणार आहेत. राज ठाकरे या मराठवाड्यातील जिल्ह्यात मुक्काम करणार असून पक्ष पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन संबंधित जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत.

नारायण राणेंनी मला उगाच धमक्या देऊ नयेत अन्यथा; जरांगेंनी पुन्हा दिला इशारा

किती जागा लढवणार?

राज ठाकरे यांनी यापूर्वी मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मनसे विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली होती. विधानसभेच्या 225 ते 250 जागा मनसे लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. निवडून येण्याची ज्याची क्षमता असेल त्यालाच तिकीट दिले जाईल असंही राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं होतं. तिकीट मिळाले की पैसे काढायला मोकळा अशा प्रवृत्तीच्या लोकांना तिकीट देणार नाही असंही राज यांनी ठणकावून सांगितलं होतं.

राज ठाकरे यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम

5 ऑगस्ट- सोलापूर
6 ऑगस्ट- धाराशिव
7 ऑगस्ट- लातूर
8 ऑगस्ट- नांदेड
9 ऑगस्ट- हिंगोली
10 ऑगस्ट- परभणी
11 ऑगस्ट- बीड
12 ऑगस्ट- जालना
13 ऑगस्ट- छत्रपती संभाजीनगर

follow us
  • fb
  • instagram
  • youtube