IAS Pooja Khedkar : वादग्रस्त निलंबित प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या (IAS Pooja Khedkar) आईचा नवा प्रताप समोर आलायं. मिक्सर ट्रकचालकाचं अपहरण करुन डांबून ठेवलं. पोलिस तपासासाठी घरी आले असता सहकार्य न करता आरोपींना पळून जाण्यास मदत करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पूजा खेडकर यांच्या आईवर करण्यात आलायं. या प्रकरणी त्यांच्यावर चतुर्श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलायं. त्यामुळे आता पुन्हा एकदा वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर चर्चेत आलीयं.
Pune City Police have registered a case against Manorama Khedekar, mother of ex-IAS trainee officer Puja Khedkar, at Chaturshrangi Police Station. She has been booked under Sections 221, 238, and 263 of BNS. The case stems from a road rage incident in Navi Mumbai, where two…
— ANI (@ANI) September 15, 2025
पूजा खेडकर यांच्या आईवर कलम २२१, २३८ आणि २६३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन अज्ञात व्यक्तींनी एका ट्रक चालकाच्या मदतनीसाचे अपहरण करून त्याला मनोरमा खेडेकर यांच्या घरी आणल्याचा आरोप आहे. तपासादरम्यान, नवी मुंबई पोलिसांनी त्या ठिकाणाचा शोध घेतला आणि खेडकर यांच्या घरी पोहोचले. जेव्हा पथकाने तपास करण्याची कारवाई केली तेव्हा मनोरमा खेडेकर यांनी अडथळा आणत आरोपींना पळून जाण्यास मदत करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप आहे.
मुलूंड ते एरोली रोडवरुन सिग्नलवर जात असताना मिक्सर ट्रकचालक प्रल्हाद कुमार २२ हा आपला मिक्सर ट्रक घेऊन जात होता. त्यावेळी एका कारला धक्का लागल्याने कारमधील दोघांनी त्याला जबरदस्तीने आपल्या कारमध्ये बसून नेत अपहरण केलं.
सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; वक्फ स्थापनेसाठी ५ वर्षे इस्लामचे पालन करणे आवश्यक नाही
या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता पोलिसांना अपहरणासाठी वापरलेली कारर वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर यांच्या चतृशृंगी हद्दीतल्या घरी मिळून आली. या ठिकाणाहून अपहरण केलेला चालक प्रल्हाद कुमारची पोलिस उपनिरीक्षक खरात यांच्यासह त्यांच्या टीमने सुटका केलीयं.
अपहरण प्रकरणी पोलिस तपास करीत असताना पूजा खेडकर यांच्या आईने पोलिसांना सहकार्य केलं नसून याऊलट अरेरावीची भाषा करुन पोलिसांशीस हुज्जत घातलीयं. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.
अजितदादा तुम्ही कोणता मराठा सुखी ठेवला? मनोज जरागेंचा नाव घेत सवाल…
मिळालेल्या माहितीनुसार चालकाला पोलीस स्टेशनला घेऊन जाण्याच्या बहाण्याने गाडीमध्ये बसवून अपहरण केल्याची तक्रार ट्रक मालक विलास धोंडीराम ढंगरे यांनी रबाळे पोलिस ठाण्यात दिली. यानंतर या प्रकरणातील दोन आरोपी हे IAS पूजा खेडकरच्या बंगल्यात पोलिसांना आढळून आले आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत खेडकर यांच्या बंगल्यावर पोहचले. मात्र तेंव्हा IAS पूजा खेडकरच्या आईकने पोलिसांना सहकार्य करण्यास टाळाटाळ केल्याचे समोर आले आहे.