अजितदादा तुम्ही कोणता मराठा सुखी ठेवला? मनोज जरागेंचा नाव घेत सवाल…
अजितदादा तुम्ही कोणता मराठा सुखी ठेवला? या शब्दांत मनोज जरागे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव घेत सवाल केला आहे.

Manoj Jarange Patil News : अजितदादा तुम्ही कोणता मराठा सुखी ठेवलायं, अजून काय अन्याय व्हायचा राहिला, आमच्या हक्काचं असून दिलं नाही तो अन्याय वेगळाच, तुम्ही कोणता मराठा सुखी ठेवला? असा थेट सवाल मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना केलायं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. सरकार म्हणून आम्ही कोणालाही नाराज करणार नाही, कोणावरही अन्याय करणार नाही, हे शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे यांना उद्देशून उदगारले. त्यानंतर मनोज जरांगे यांनी अजितदादांवर थेट विधान करीत सवाल केले आहेत.
पाकिस्तान विरुद्ध सामन्याआधी टीम इंडियाला धक्का, शुभमन गिलला दुखापत; नक्की काय घडलं?
पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, त्या परळीच्या लाभार्थी गँगने सर्व वंजारी, ओबीसी बदनाम केले. त्या गँगला आता बोलता येईना म्हणून दुसरे नेते बोलावून घेतले आणि इकडे जातीवाद पेटवून दिला, मला दुःख वाटते, आमच्या लेकरा बाळाला आरक्षण मिळत आहे तर हे विरोध करत आहेत. यांना किती महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे, यांचे किती वाईट विचार आहेत हे समोर येते. ओबीसींना आरक्षण मिळताना आमचे लोक समाधानी असायचे. आम्ही लढून मिळवले, यांना लढावे लागले नाही, दिले पण आमच्याच लोकांनी, यांचा जीआर पण आमच्या मराठ्यांच्या नेत्यांनी दिला. आमचेच इतकी वर्षे नुकसान झाले, आमचे आरक्षण तुम्ही इतके वर्षे खात होतात, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांना गुडन्यूज! वयोमर्यादा ओलांडली तरी संधी मिळणार
ज्याच्या नोंदी आहे त्यांना दिले पाहिजे, हे मत आम्ही जाहीर केलेले आहे. कारण यांच्यासारख्या मी जातीवादी नाही. कोणाच्या लेकराचे वाटोळे आम्ही कधी होऊ देत नाही, आम्हाला विरोध कोण करते, लाभार्थी टोळीचा ऐकून, परळीची लाभार्थी टोळी. त्याचा एक डोळा चष्म्याच्या बाहेर यायला लागला आता, असे त्याच्या जवळचेच कार्यकर्ते सांगत आहे. ती अजित पवारांची टोळी, विनाकारण ते मराठ्यांच्या आणि धनगरांचे भांडण लावायला लागले, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.
परळीची लाभार्थी टोळी अशी आहे की ती प्रत्येक जातीचा वापर करते. मोदीसाहेब सुद्धा एवढ्या मताने निवडून नाही आले, तितकी मुंडे साहेबांची मोठी मुलगी निवडून आणली मराठ्यांनी. एक सापडून आणलं कुठून तरी हिंडत तर इकडून तिकडं भुंगार ..हे कसलेही भाषा वापरायला लागले पण यांच्या भाषा आम्ही इथून पुढे नीट करणार आहे आता,या शब्दांत मनोज जरांगेंनी इशारा दिलायं.