IAS officer transfers! Navalkishore Ram takes over as Pune Municipal Commissioner : राज्यातील आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले सेवा निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी नवल किशोर राम यांची पुणे महानगरपालिकेचे (PMC) आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
१५ हजारांचे ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली; वडेट्टीवारांची टीका
पुणे महानगर पालिकेचे सध्याचे आयुक्त राजेंद्र भोसले हे 30 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यानंतर 31 मे रोजी नवल किशोर राम हे पुणे महानगरपालिकेचे (PMC) आयुक्त म्हणून पदभार स्विकारणार आहेत. नवल किशोर राम यांची पुणे महानगरपालिकेचे (PMC) आयुक्त म्हणून नियुक्ती ही शहराच्या प्रशासनात एक महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहराच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.
अभिनेत्रीचा अंडरवर्ल्डच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न फेल, गँगस्टरने तिला हॉटेलमध्ये…
त्यांच्या प्रशासकीय अनुभवाविषयी सांगायचे झाले तर नवल किशोर राम हे 2008 बॅचचे IAS अधिकारी असून, ते बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत. त्यांनी नांदेड येथे आपल्या प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि यवतमाळ जिल्हा परिषदेत CEO म्हणून काम केले. त्यानंतर बीड आणि औरंगाबाद जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. 2018 मध्ये त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कोरेगाव भीमा अभिवादन दिनाच्या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले आणि 2019 च्या महापुराच्या काळात आपत्ती व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
पुण्यात कोविड-19 महामारीच्या काळात नवल किशोर राम यांनी जिल्हाधिकारी म्हणून प्रभावी उपाययोजना राबवल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुमारे 64% होते, तर मृत्यूदर सुमारे 2.06% होता, जो राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी होता.2020 मध्ये नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. या भूमिकेत त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांच्या अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले.
वक्फ इस्लामचा अविभाज्य भाग नाही, तो धर्मदाय प्रकार…; केंद्राचा सुप्रीम कोर्टात युक्तीवाद
नवल किशोर राम यांची PMC आयुक्तपदी नियुक्ती झाल्याने शहराच्या विकासासाठी नवे दृष्टीकोन आणि कार्यपद्धती अपेक्षित आहेत. त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा उपयोग करून शहरातील नागरी सुविधा, वाहतूक व्यवस्था, कचरा व्यवस्थापन आणि आरोग्य सेवा यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिका अधिक कार्यक्षम आणि उत्तरदायी बनण्याची अपेक्षा आहे. शहरातील नागरिकांच्या गरजा ओळखून, त्यानुसार धोरणे राबवण्यावर त्यांचा भर राहील. नवल किशोर राम यांच्या नियुक्तीमुळे पुणे शहराच्या प्रशासनात नवे पर्व सुरू झाले आहे. त्यांच्या कार्यकौशल्यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.
मराठवाड्यात अवकाळीचा धुमाकूळ; वीज कोसळून आतापर्यंत २७ नागरिकांचा मृत्यू, तर…
नवल किशोर राम यांच्याबरोबरच इतरही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये शीतल तेली-उगले (IAS:RR:२००९) यांची पुणे येथे क्रीडा आणि युवा आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जे.एस. पापळकर (IAS:SCS:२०१०) जिल्हाधिकारी, धुळे यांची विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर विभाग, छत्रपती संभाजी नगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सी.के. डांगे (IAS:SCS:२०१०) यांची मुख्य सचिव कार्यालय, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सौरभ कटियार (IAS:RR:२०१६) जिल्हाधिकारी, अमरावती यांची मुंबई येथे मुंबई उपनगर जिल्हा, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे. भाग्यश्री विसपुते (IAS:RR:2017) मुख्य प्रशासकीय अधिकारी, (नवीन टाउनशिप), सिडको, छत्रपती संभाजी नगर यांची जिल्हाधिकारी, धुळे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.आनंद भंडारी (IAS:NON-SCS:2017) अतिरिक्त सेटलमेंट आयुक्त आणि अतिरिक्त संचालक, भूमी अभिलेख, पुणे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहिल्यानगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आशिष येरेकर (IAS:RR:2018) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहिल्यानगर यांची जिल्हाधिकारी, अमरावती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.