महापालिका निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची जोरदार (Pune) तयारी सुरू असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्याही निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकरांनी आज उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला. यावेळी, अर्ज भरण्यासाठी त्याची पोलीस व्हॅनमधून सिनेस्टाईल एन्ट्री पाहायला मिळाली.
मी उमेदवार म्हणत बंडू आंदेकर यांनी घोषणाबाजी केली. नेकी का काम आंदेकर का काम, अशा घोषणा देत आपण निवडणूक लढवत असल्याचं बंडू आंदेकरने जाहीर केलं. नेकी का काम आंदेकरका नाम, बघा बघा मला लोकशाहीत कसं अणलाय, आंदेकरांना मत म्हणजे विकास कामाला मत, मी उमेदवार आहे दरोडेखोर नाही. वनराज आंदेकर जिंदाबाद, अशी घोषणाबाजी बंडू आंदेकरने यावेळी केली.
बंडू आंदेकर यांचा मुलगा वनराज आंदेकर हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असताना नगरसेवक होता. त्यानंतर, सोनाली आंदेकर, लक्ष्मी आणि बंडू आंदेकरांनी आज अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी लक्ष्मी आणि बंडू आंदेकरांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले होते. तर, आता बंडू आंदेकरांनाही राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा या व्हिडिओनंतर सुरू आहे.
पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्याही निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. मी उमेदवार म्हणत बंडू आंदेकर यांनी घोषणाबाजी केली. नेकी का काम आंदेकर का काम, अशा घोषणा देत आपण निवडणूक लढवत असल्याचं बंडू आंदेकरने जाहीर केलं.#banduandekar #PuneMunicipalCorporationElection @PuneCityPolice pic.twitter.com/lPhObQ8gYQ
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) December 27, 2025
