Download App

Diwali Festival 2024: फटाक्यांच्या आतषबाजीचा कडेलोट; फक्त पुणे शरहात ३१ ठिकाणी आगीच्या घटना

पुणे शहरात काल फटाक्यांच्या अग्निशामक दलातील जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचं काम केलं आहे.

  • Written By: Last Updated:

Incidents Fire Crackers In Pune : काल देशभरात दिवाळीचा सण साजरा झाला. (Fire) या सणांना सर्वत्र फटाक्यांची मोठी धामधूम पाहायला मिळते. पुणे शहरात काल फटाक्यांच्या आतषबाजीमुळे विविध भागात ३१ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. अग्निशामक दलातील जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

शहरातील आगीच्या घटना

१) सायंकाळी ७.३५ वा. – कळस येथे रस्यावर कचरा पेटला.

२) ७.३६ वा. – मांजरी, मोरे वस्ती येथे ऊसाच्या शेतामध्ये आग.

३) ८.०५ वा. – बालेवाडी फाटा, काका हलवाई स्वीटसमोर तार पेटली.

४) ८.०६ वा. – कोथरूड, रामबाग कॉलनी येथे झाडाला आग.

५) ८.१२ वा.- मार्केटयार्ड, गेट क्रमांक पाचजवळ कचरा वाहनामधील कचरा पेटल्याने आग.

६) ८.१९ वा. – सहकारनगर पोलिस चौकीजवळ नारळाच्या झाडाला आग.

७) ८.२२ वा. – मंगलदास रस्ता येथे झाडाला आग.

८) ८.२४ वा. – गणेश पेठ, बुरुड आळी येथे ताडपत्री पेटल्याने आग.

९) ८.३० वा. – कात्रज, संतोषनगर येथे इमारतीच्या गॅलरीमध्ये आग.

१०) ८.३४ वा. – रविवार पेठ, तांबोळी मस्जिद नजीक कपड्याच्या दुकानात आग.

११) ८.३८ वा. – बी.टी. कवडे रस्ता, भारत फोर्ज कंपनीसमोर एका ट्रकला आग.

१२) ८.४० वा – लक्ष्मी रस्ता, विजय टॉकीजजवळ घरामध्ये आग.

१३) ८.४५ वा. – कळस स्मशानभूमीजवळ एका शेतामध्ये आग.

१४) ८.५४ वा. – टिळक रस्ता, महाराष्ट्र मंडळाशेजारी झाडाला आग.

१५) ९.०१ वा. – सिहंगड रस्त्यावर नवश्या मारुतीजवळ घरामध्ये आग.

१६) ९.०३ वा. – औंध, बीआरटीएस रस्ता येथे घरामध्ये आग.

१७) ९.११ वा. – गणेश पेठ, डुल्या मारुती मंदिराजवळ गोदामात आग.

१८) ९.२३ वा. – वडगाव बुद्रूक, गोसावी वस्ती येथे घरामध्ये आग.

१९) ९.२५ वा. – कल्याणीनगर, गोल जिम चौक येथे मोकळ्या मैदानात आग.

२०) ९.२९ वा. – गणेश पेठ, बुरुड आळी येथे पुन्हा ताडपत्रीला आग.

२१) ९.३५ वा. – चंदननगर, खराडी बायपास येथे कचरा पेटला.

२२) ९.४० वा. – शिवणे, दांगट पाटील नगर येथे कपड्याच्या गोदामात आग.

२३) ९.४२ वा. – पद्मावती, पंचवटी मित्रमंडळ येथे गॅलरीमधे आग.

२४) ९.५५ वा. – सासवड रस्त्यावर सोनाई गार्डनजवळ पीव्हीसी पाईप गोदामात आग.

२५) १०.०१ वा. – गंज पेठ, महात्मा फुले वाड्यानजीक कचरा पेटला.

२६) १०.०२ वा. – हडपसर, डीपी रस्ता कचरा पेटला.

२७) १०.२७ वा. – बिबवेवाडी, अप्पर डेपो येथे मोकळ्या मैदानात कचऱ्याला आग.

२८) १०.३४ वा. – रास्ता पेठेतील आयप्पा मंदिराजवळ इमारतीत गॅलरीत आग.

२९) १०.५१ वा. – खराडी, थिटे वस्ती येथे घरामध्ये आग.

३०) ११.०७ वा. – कोथरूड, हॅप्पी कॉलनी येथे टपरीला आग.

३१) ११.४५ वा. – गंगाधाम, आई माता मंदिराजवळ कचऱ्याला आग.

follow us