देशात गॅस तुटवडा! पु्ण्यात मेस बंद स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी निघाले गावाकडं…

Iran-Israel-Ametrica War मुळं कमर्शियल गॅस पुरवठा खंडीत, मेसवर अवलंबून असणाऱ्या विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे.

Iran Israel Ametrica

Iran Israel Ametrica

Iran-Israel-Ametrica War LPG Gas shortage Messes closed Pune competitive exams students leave for villages : इस्त्रायल आणि अमेरिकेमधील वाढत्या तणावाचे (Iran-Israel-Ametrica War ) परिणाम आता भारतातही जाणवू लागले असून, पुण्यात व्यावसायिक गॅस पुरवठा तात्पुरता बंद करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळं कमर्शियल वापराचा गॅस (LPG Gas ) पुरवठा थांबवण्यात येत आहे. सिलेंडर्स घेऊन जाण्यासाठी पुढील सूचनेपर्यंत कृपया गाड्या पाठवू नका. परिस्थिती सुधारली की लगेच कळवले जाईल असे सरकाकडून डिलर्सला सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मानाच्या गदेचे पूजन

याचा फटका मेस आणि हॉटेल्सना होत आहे. त्यामुळे मेसवर अवलंबून असणाऱ्या स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर जास्त दरातील जेवण किंवा मेस बंद झाल्याने उपासमारीची वेळ येणार आहे. याबाबत लेट्सअप मराठीने पुण्यातील स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी या संकटाची दाहकता सांगत आपल्या व्यथा मांडल्या.

Bol Bol Rani : शांततेत दडलेला थरार ! ‘बोल बोल राणी’ 10 जुलैला होणार प्रदर्शित

यावेळी बोलताना हे विद्यार्थी म्हणाले की, आमच्या मेस आणि जेथे आम्ही नेहमी जातो त्या हॉटेल्सवाल्यांनी आम्हाला सांगितले की, त्यांना मिळणाऱ्या गॅस पुरवठ्याची साखळी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे आम्हाला एक तर जास्त भावामध्ये ब्लॅकने सिलेंडर घ्यावे लागतील. नाहीतर मेस किंवा हॉटेल बंद करावे लागतील. याचा आर्थिक भार सर्व विद्यार्थ्यांवर पडणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्राला हसवण्यासाठी सज्ज! स्टँडअप कॉमेडियन मंदार भिडेंची महाराष्ट्र टूर…

त्यामुळे या विद्यार्थ्यांनी सरकारने यामध्ये हस्तक्षेप करत गॅस पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली आहे. अन्यथा विद्यार्थी रस्त्यावर उतरतील तेव्हा सरकारला हे सर्व सांभाळने अवघड जाईल. आसपासच्या देशांमध्ये देखील विद्यार्थी आंदोलनांमुळे काय परिस्थिती झाली आहे. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ येणार नाही याची सरकारने काळजी घ्यावी असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.

Exit mobile version