Download App

जेजुरी विश्वस्तांचा प्रश्न सुटला; ग्रामस्थांच्या लढ्याला मोठं यश

  • Written By: Last Updated:

Jejuri News :  जेजुरीतील ग्रामस्थांनी काही दिवसांपासून आंदोलन सुरु केले होते. खंडोबा देवस्थानमध्ये नेमलेल्या विश्वस्त निवडीच्या विरोधात त्यांनी हे आंदोलन सुरु केले होते. त्यांच्या आंदोलनाला आता यशा आले आहे. मार्तंड देवस्थानच्या विश्वस्त मंडळाची सदस्यसंख्या 7 वरुन 11 होणार आहे. धर्मादाय आयुक्तांच्या सुनावणीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून जेजुरीचे ग्रामस्थ यासंदर्भात आंदोलन करत होते. आज अखेर त्यांच्या आंदोलनाला यश आले असून देवस्थानच्या विश्वस्त मंडळाची संख्या 7 वरुन 11 करण्यात आली आहे. तसेच जेजुरी ग्रामस्थ 6 आणि बाहरचे 5 अशा एकुण 11 विश्वस्तांची नियुक्ती होणार आहे. धर्मादाय आयुक्तांच्या सुनावणीत हा निर्णय घेण्यात आला असून घटना दुरुस्ती करुन पुन्हा एकदा सोमवारी अंतिम सुनावणी होणार असल्याचं धर्मादाय आयुक्तांनी सांगितलं आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Nilwande Dam : आरोप-प्रत्यारोपांपेक्षा शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं समाधान माना, विखेंनी थोरातांना डिवचलं

मागील जवळपास 12 दिवसांपासून जेजुरीतील ग्रामस्थांचं खंडोबा देवस्थानच्या नेमलेल्या विश्वस्त निवडी विरोधात आंदोलन सुरु होतं. आज कीर्तन करुन आंदोलन करण्यात आलं. जेजुरी ग्रामस्थांनी धर्मादाय आयुक्तांकडे जेजुरीतील मार्तंड देवस्थानाच्या विश्वस्त निवडीविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ग्रामस्थांनी विश्वस्त मंडळातील सदस्य संख्या वाढवण्याची मागणी केली होती. मागणी मान्य न झाल्यास सोमवारपासून जेजुरी बंद करण्याचा इशारा देण्यात आला होता. आज अखेर ही मागणी मान्य करण्यात आली आहे.

‘सूत्रधार शोधता येतो पण सरकारची इच्छाशक्ती पाहिजे’, अजित पवारांचा हल्लाबोल

दरम्यान, यासाठी जेजुरीच्या ग्रामस्थांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. राज ठाकरे यांना हा मुद्दा पटवून देण्यात आला त्यानंतर त्यांनी याप्रकरणी सर्वतोपरी मदत करणार असल्याचं ग्रामस्थांना सांगितलं होतं. राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशई बोलून मदत करण्याचे आश्वासन दिले होते.

Tags

follow us