Download App

इथून पुढे विचारू नका Who Is Dhangekar?; हाती ‘धनुष्य’ घेण्यापूर्वीच पवारांच्या नेत्यानं पेटवली वात

काँग्रेसचे नेते रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेस सोडणार असल्याचे जाहीर केल्यानंतर काही महिन्यांपूर्वी धंगेकरांना जिव्हारी लागणाऱ्या भाजप नेत्याचं विधान पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे

  • Written By: Last Updated:

पुणे : काँग्रेसचे नेते रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेस सोडणार असल्याचे जाहीर केल्यानंतर काही महिन्यांपूर्वी धंगेकरांना जिव्हारी लागणाऱ्या भाजप नेत्याचं विधान पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. पण यावेळी हे विधान भाजप नेत्यानं केलेले नाही तर, आता इथून पुढे विचारू नका Who Is Dhangekar? असे विचारू नका असे म्हणत शरद पवारांच्या (Sharad Pawar) आमदारानं संधी साधत भाजपच्या नेत्याला जोरदार टोला लगावत धंगेकरांच्या महायुतीतील प्रवेशापूर्वी जुनी खपली उकरून काढली आहे. (Jitendra Awhad On Ravinda Dhangekar)

पवारांच्या आमदारांची खोचकं पोस्ट काय?

धंगेकरांनी काँग्रेसला रामराम करण्याचे घोषित केल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एक्सवर पोस्ट करत भाजप नेते चंद्रकांत पाटलांना चिमटे काढले आहे. या पोस्टमध्ये आव्हाड म्हणतात की, “चंत्रकांत पाटील साहेब आता इथून पुढे विचारू नका Who Is Dhangekar? कारण आता ते तुमचे सखे सोयरे झालेत बरं का”, अशी खोचक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

चंद्रकांत पाटलांनी केला होता जिव्हारी लागणारा प्रश्न

काही महिन्यांपूर्वी पुण्यात पार पडलेल्या कसबा पोटनिवडणुकीत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रचारावेळी काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकरांना चांगलंच डिवचलं होतं. एवढेच नव्हे तर, भरसभेत हू इज धंगेकर तो आमच्यासमोर टिकू शकत नाही असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर धंगेकरांचे समर्थक पेटून उटले होते आणि या पोटनिवडणुकीत धंगेकर जाएंट किलर ठरत निवडून आले होते. त्यानंतर आता धंगेकरांनी काँग्रेसला रामराम करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता काही दिवसांपूर्वी धंगेकरांवर जिव्हारी टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना उद्देशून आव्हाडांनी तेच जुनं हत्यार बाहेर काढत महायुतीतील मित्रपक्षाच्या पक्षात प्रवेश करण्यापूर्वीच खपली काढत टीका केली आहे.

मुंडे बालाजी तांदळेवर भडकले होते; दमानियांनी थेट नावं घेत केले गंभीर आरोप

काँग्रेस सोडण्याचं कारण काय? काय म्हणाले धंगेकर?

मी पहिल्यांदाच काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्य़कर्ते आणि मतदारांचा आभारी आहे. मी त्यांचा कायम आभारी आहे. माझी विचारसरणी मानवतवादी आहे. काँग्रेसने माझ्यासारख्याला त्यांनी विधानपरिषद, लोकसभा अशी उमेदवारी दिली. शेवटी जनता ठरवते कोणाला निवडून द्यायचं,  कोणाला नाही? काँग्रेसचे पुण्यातील कार्यकर्ते उत्साही आणि काम करणारे आणि प्रेमळ आहेत.

पक्षाचे पदाधिकारी चांगल्याप्रकारे माझ्या पाठी उभे राहिले. निवडणुकीत दोनवेळा उभा राहून माझा पराभव झाला, पण मी कोणाला दोष दिला नाही. काँग्रेस पक्ष सोडणं सोपं नाही. पण माझ्या मतदारसंघातील लोकांशी चर्चा घेऊन कठीण निर्णय घेण्याची वेळ आली. शिंदे साहेब आणि उदय सामंत यांनी मला अनेकदा फोन केली. धंगेकर आमच्याकडे या, अशी ऑफर दिली. आमच्यात मित्रत्त्वाचं नातं आहे. त्यामुळे एकत्र काम करण्याचं ठरवले. मी त्यांना सात वाजता भेटून पुढील निर्णय घेईन, असे रवींद्र धंगेकर यावेळी म्हणाले.

पुणे मेट्रो रोखली, पोलिसांशी हुज्जत घातली ! नरेंद्र पावटेकरांची लगेच राष्ट्रवादीतून हकालपट्टी

ज्या पक्षासोबत मी गेली १०-१२ वर्षे काम करत आहे. त्यामुळे पक्षातील अनेकांसोबत कौटुंबिक नातं तयार झाले आहे. सर्वांनीच माझ्यावर प्रचंड प्रेम केले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सगळ्यांना माझ्यापाठी ताकद उभी केली. मी निवडणूक हरलो हा नंतरचा विषय,पण सगळ्यांना त्यांच्या ताकदीप्रमाणे कष्ट केले. एखादा पक्ष सोडताना दु:ख होतं. शेवटी आपण माणूस आहोत. कार्यकर्ते बऱ्याच दिवसांपासून ऐकत नव्हते. मी मतदारांशी संवाद साधला तेव्हा ते म्हणत होते आता आमची कामं कोण करणार, लोकशाहीत सत्ता असल्याशिवाय आपण सर्वसामान्यांना न्याय देऊ शकत नाही असं धंगेकर यावेळी म्हणाले.

follow us