Download App

अभ्यास कच्चा म्हणून लोक तुम्हाला नाकारतात; पुणे अपघात प्रकरणी मोहोळ यांचं धंगेकरांना चोख प्रत्युत्तर

Muralidhar Mohol यांनी ट्विट करत धंगेकरांनी पोलिसांसह फडवीसांवर केलेल्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

Kalyani Nagar Car Accident Muralidhar Mohol Criticize Ravindra Dhangekar : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये ( Kalyani Nagar Car Accident ) 19 मे च्या पहाटे दारूच्या नशेत पोर्शे ही महागडी कार भरधाव वेगात चालवत एका अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडलं. या प्रकरणामध्ये पुण्याचे महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) यांनी पोलिसांसह फडवीसांवर ट्विट करत आरोप केले होते. त्याला आता भाजपचे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ ( Muralidhar Mohol ) यांनी देखील ट्विट करत चोख प्रत्युत्तर दिले आहे.

सर्वाधिक पंतप्रधान अन् दिल्लीच्या सत्तेतही वजन; मोठ्या राज्याची इलेक्शन ‘हिस्ट्री’ही खास…

या ट्विटमध्ये मोहोळ म्हणाले की, लोक तुम्हाला का नाकारतात? कारण, तुमचा अभ्यास कच्चा असतो. खोटे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी तुम्ही काहीही करु शकता. आताच्या निवडणुकीतही पुणेकरांनी ते पाहिलं आणि आता या संवेदनशील प्रकरणातही तेच!कोणत्याही घटनेत पोलीस ठाणे स्तरावर एफआयआर लिहून घेतला जातो. त्यात लावलेली कलमे योग्य आहेत की नाही, हे वरिष्ठ अधिकारी तपासतात आणि मग तो न्यायालयात जातो.

मोठी बातमी : विशाल अग्रवालसह तिघांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी

मंगळवारीही उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी हेच सांगितले की, या प्रकरणात कलम 304 हे पहिल्यापासून लावले आहे, म्हणजे मूळ एफआरआय दाखल करतानाच ! ही 19 तारखेचीच कॉपी तुमच्या माहितीसाठी ! कलम 304 त्यात आधीपासूनच आहे. त्यामुळे ‘साप-साप’ म्हणून ‘भुई धोपटणे’ हे धंदे सोडून द्या. पुणेकर तुम्हाला चांगलंच ओळखून आहेत. असं मोहोळ म्हणाले.

काय म्हणाले होते रवींद्र धंगेकर?

गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पुणेकरांची दिशाभूल करणाऱ्या काही बाबी समोर आल्या आहेत.
१) घटना घडल्यानंतर पहिल्या FIR मध्ये 304 चा उल्लेख नाही.अर्थात ही येरवडा पोलीस स्टेशनचे पी.आय व तपास अधिकारी यांनी गुन्ह्याचे गांभीर्य कमी व्हावे यासाठी केलेली पळवाट आहे का…? यासाठी कुठला आर्थिक व्यवहार झाला आहे का? विशेषतः ही F.I.R प्रेसला देखील व्हायरल करण्यात आली होती.

२) पुणेकरांनी या प्रकरणात आवाज उठवल्यानंतर 304A सोबतच 304 हे कलम लावण्यात आले. 3) राज्याच्या गृहमंत्र्यांना पहिली FIR copy बदलल्या बाबत माहिती देण्यात आली नव्हती का..? की मग त्यांना माहीत असूनही ते पोलीस प्रशासन व बिल्डर ला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत का..? आपलं पुणे शहर वाचविण्यासाठी या गोष्टींच्या मुळाशी जाणे अत्यंत गरजेचे आहे.अधिकारी – मंत्री तर निघून जातील पण शहराला लागलेली ही किड आमच्या पुण्याच्या पिढ्यनपिढ्या बरबाद करण्याचे काम करेल. असं धंगेकर म्हणाले होते.

follow us

वेब स्टोरीज