Download App

Kasba By Election : अक्षय गोडसे यांनी घातला गोंधळ, आधी धंगेकरांना नंतर रासने यांना पाठिंबा

पुणे : पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्यावरुन श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे सदस्य अक्षय गोडसे गोंधळ घालत असल्याचं दिसून येतंय. अक्षय गोडसे यांनी आधी महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना पाठिंबा दिला आता भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं.

अक्षय गोडसे म्हणाले, हेमंत रासने आमच्या घरातील सदस्य असून गेल्या 80 वर्षांपासून आमचे घरोब्याचे संबंध आहेत. कसबा पेठ निवडणुकीत कारण नसताना समाजात चुकीचा गैरसमज पसरवला जात आहेत. मी आणि माझ्या कुटुंबाकडून भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना पाठिंबा जाहीर करत असल्याचं अक्षय गोडसे यांनी स्पष्ट केलंय.

Raju Shetti : राज्यकर्त्यांनो जरा तरी लाज बाळगा, शेतकऱ्यांनी जगायचं कसं?

दरम्यान, अक्षय गोडसे यांनी काही वेळापूर्वीच महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना पाठिंबा जाहीर केला होता. प्रसारमाध्यमांमध्ये त्यांच्या प्रसारितही झाल्या होत्या. त्यानंतर अक्षय गोडसे यांनी गोंधळ घातल्याचं दिसून आलं आहे.

Devendra Fadanvis : ठाकरे आणि मी वैचारिक विरोधक, शत्रू नव्हे

भाजपचे उमेदवार हेमंत रासने देखील दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे पदाधिकारी आहेत. हा ट्रस्ट आत्तापर्यंत एकजुटीने राजकीय भूमिका घेत आला. अक्षय गोडसेंनी रविंद्र धंगेकरांना पाठिंबा दिल्यानंतर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यामंध्ये फूट पडल्याचे दिसून आलं होतं.

MPSC अध्यक्ष ठाम; हवा तर राजीनामा घ्या… पण तो निर्णय घेणार नाही

गोडसे परिवार गेल्या अनेक वर्षे मतदार संघात वास्तव्यास आहे. याआधी प्रतापराव गोडसे यांनी देखील राजकारणात उतरण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, ते यशस्वी झाले नाहीत. त्यांनी सर्वपक्षीयांशी सारख्या अंतराने त्यांनी संबंध ठेवले होते. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत अक्षय देखील सर्वपक्षीयांशी संबंध ठेवत असल्याचं बोललं जात होतं.

‘उत्तम कामगिरी करूनही’ Sanju Samson टीम इंडियामधून बाहेर? हे मोठे कारण आले समोर

मात्र, आता त्यांनी आपली पाठिंब्याची भूमिका बदलली असून भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनाच माझा व कुटुंबियांचा पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, अक्षय गोडसे यांचा पाठिंबा नेमका कोणाला? याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून निवडणुकीत अक्षय गोडसे कोणाच्या प्रचारात दिसतील? हे आता येणारा काळच ठरवणार आहे.

Tags

follow us