Devendra Fadanvis : ठाकरे आणि मी वैचारिक विरोधक, शत्रू नव्हे

  • Written By: Published:
Devendra Fadanvis : ठाकरे आणि मी वैचारिक विरोधक, शत्रू नव्हे

अहमदनगर : देवेंद्र फडणवीस आज अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे महसूल परिषदेत आले होते त्यानंतर ते माध्यमांशी बोलताना म्हणाले ठाकरे आणि मी वैचारिक विरोधक आहोत शत्रू नव्हे, त्यांनी दुसरा विचार पकडला मी दुसरा विचार पकडला आहे.

पत्रकारांनी त्यांना विचारले की काल आदित्य ठाकरे म्हणाले की आम्ही शत्रू नाहीत, आमचे चांगले संबंध आहेत? या प्रश्नाला उत्तर देत फडणवीस म्हणाले महाराष्ट्रामध्ये ही संस्कृती आहे की आपण वैचारिक विरोधक असू परंतु शत्रू नसतो. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात थोडं शत्रुत्व आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु ते आपल्याला संपवायचे आहे.

त्यानंतर पत्रकारांनी त्यांना विचारले की संजय राऊत म्हणतात हे जे काही झाले आहे त्याला फडणवीस कारणीभूत आहेत? त्यावर फडणवीस म्हणाले जर संजय राऊतांना माझी क्षमता जास्त वाटते त्याबद्दल त्यांचे आभार राऊत जे बोलतात ते गांभीर्याने घेण्यासारखे नाही, त्यांनी लोकांना खरं वाटेल असं बोलावं.

सुप्रिया सुळे यांच्या भावी मुख्यमंत्री पदावर फडणवीस म्हणाले राष्ट्रवादीमध्ये ही पद्धत आहे, ते नेहमी सांगत असतात भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री, त्यासाठी त्यांना माझ्या शुभेच्छा. असं काही नसत कोणीही मुख्यमंत्री होऊ शकत, उद्धव ठाकारे मुख्यमंत्री होतील असं कोणाला वाटलं होत का ? परंतु ते झाले. असे देखील फडणवीस म्हणाले.

Kasba By Election : हेमंत रासने यांना आपल्या मंडळातूनच धक्का 

कसाब आणि पिपरी पोट निवडणुकीच्या प्रचारावर बोलताना फडणवीस म्हणाले मागच्या सर्व पोट निवडणुकीच्या प्रचाराला मुख्यमंत्री गेलेत तसेच उपमुख्यमंत्री देखील गेलेत. राष्ट्रवादीला काहीतरी वेगळं दिसत असेल म्हणून त्यांनी शरद पवार साहेबांपासून सर्व नेते या प्रचारात उतरवले आहेत. या पूर्वीच्या कुठल्याच पोट निवडणुकीत शरद पवार साहेब प्रचारासाठी गेले नाहीत. निवडणूक कोणतीही असो ती गांभीर्याने घ्यांची असते, मत मागायला लाज कसली असे फडणवीस म्हणाले.

पहाटेच्या शपथविधी वर बोलताना फडणीविस म्हणाले मी काही बोललो की समोरून दुसऱ्या गोष्टी बाहेर येतात,असच हळूहळू अजून गौप्य स्फोट होतील, सगळ्या गोष्टी बाहेर येतील

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube