Download App

Kasba Bypoll मतदार यादीत मयतांची नावे… जिवंत व्यक्तिंची नावे गायब!

  • Written By: Last Updated:

पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीत (Kasba Bypoll) आज प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार समोर आला. एकीकडे सकाळ सत्रात मतदारांचा उत्साहच दिसला नाही तर दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या याद्यामध्ये अनेक मयतांची नावे आढळून आली. त्यामुळे बोगस मतदान होण्याचा धोका व्यक्त होत आहे. मतदार याद्या आद्ययावत केल्याचे जाहीर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात मयतांची नावे मतदार याद्यात आढळून आली आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाचा (Election Commission) भोंगळ कारभार नेहमीप्रमाणे चव्हाट्यावर आला आहे.

Ajit Pawar राज्यात कायदा, सुव्यवस्थेचा बोजवारा… मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निवडणूक प्रचारात व्यस्त!

कसबा पेठ मतदार संघात एकीकडे जिवंत लोकांची नावे मतदार यादीतून गायब झाली आहेत तर दुसरीकडे मृत व्यक्तींची नावे मोठ्या प्रमाणात आढळली आहेत. जिवंत व्यक्तींची नावे तीन-चार मतदार केंद्रावर फिरूनही सापडत नव्हती. त्यामुळे मतदार मतदान न करताच परत गेल्याचे पाहायला मिळाले.

Tags

follow us