Ajit Pawar राज्यात कायदा, सुव्यवस्थेचा बोजवारा… मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निवडणूक प्रचारात व्यस्त!
मुंबई : राज्यात विरोधी पक्षाच्या नेत्यांना धमक्या दिल्या जात आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavhan), राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut), काँग्रेसच्या नेत्या डॉ. प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांच्यासह इतरही विरोधी पक्षाच्या नेत्यांवर हल्ले करण्याचे, मारण्याच्या धमकी दिली जात आहे. मात्र, त्याकडे साफ दुर्लक्ष करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे कसबा मतदार संघात निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत, असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावेळी केला.
बारामतीत येऊन अजित पवारांचे बारा वाजवून दाखवाच; राष्ट्रवादीने स्वीकारले राणेंचे चॅलेंज
राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन सोमवार (दि. २७) सुरु होत आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे, छगन भुजबळ बोलत होते. काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन छत्तीसगडच्या रायपूर येथे असल्याने राज्यातील काँग्रेसचे सर्व नेते तिकडे गेले आहेत.
अजित पवार म्हणाले की, वस्तुत: प्रचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कोणत्याही निवडणुकीचा प्रचार करण्याला हरकत नाही. मात्र, एकदम गल्ली बोळात फिरून प्रचार सुरु आहे. मात्र, उर्वरित राज्यात काय सुरु आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळत नाही. विरोधी पक्षाच्या नेत्यांना धमक्या दिल्या जात आहेत. या सर्व प्रश्नाकडे राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र, त्यांना त्याचे काही देणेघेणे असल्याचे दिसत नाही.