Download App

मोहितेंसमोर नवी अडचण; चुकीचा उमेदवार दिला तर ‘तिसरा’ पर्याय देणार? खेडमध्ये सर्वपक्षीय नेते एकत्र

ही आळंदी विधानसभेसाठी ही अतिशय महत्त्वाची घटना असून आतापर्यंत खेड तालुक्यामध्ये अशा प्रकारे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येत निर्णय घेतले.

  • Written By: Last Updated:

Khed-Alandi Assembly constituency : विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election) बिगुल वाजल्यानंतर आता महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत अंतिम चर्चा सुरू आहेत. तर विद्यमान, संभाव्य उमेदवारांवर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील खेड-आळंदी मतदारसंघामध्ये (Khed-Alandi Assembly constituency) सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येत चाकण येथे एक बैठक घेतली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोनही बाजूने जर चुकीचे उमेदवार दिले गेले तर तिसऱ्या पर्याय दिला जाऊ शकतो, असा इशाराच या बैठकीत देण्यात आला आहे. त्यामुळे अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Mla Dilip Mohite) व संभाव्य शरद पवार गटाचे उमेदवार यांच्यासमोर अडचणी उभ्या राहू शकतात.

भाजपचा चिंचवडचा उमेदवार ठरला! आमदार अश्विनी जगतापांचा ‘या’ उमेदवाराला ग्रीन सिग्नल…

खेड -आळंदी विधानसभेच्या उमेदवारीच्या संदर्भात चर्चा झाल्याची चर्चा झाली आहे. महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही बाजूने जर चुकीचे उमेदवार आले तर तालुक्याच्या हितासाठी गुन्हेगारी आणि वादविवाद थांबवण्यासाठी,आणि तालुका चुकीच्या व्यक्तीच्या हातात जाऊ नये यासाठी तिसरा पर्याय देण्याचा विचार करण्यात आला आहे.
खेड तालुक्यातील सर्व पक्षाचे प्रमुख नेते बैठकीला हजर होते. यावेळी शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, जिल्हाध्यक्ष समीरभाऊ थिगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य अनिलबाबा राक्षे, युवा नेते सुधीर मुंगसे, माजी सभापती रामदास ठाकूर, शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, निवडणूक समन्वयक माजी उपसभापती अमोलदादा पवार, शिवसेना शिंदे गटाचे संघटक अक्षय जाधव, तालुकाप्रमुख राजूशेठ जवळेकर, प्रदूषण महामंडळाचे संचालक नितीन गोरे, सुनील धंद्रे, युवा नेते संजय घनवट, बाजार समितीचे संचालक अनुराग जैद, सागर मुरहे , विशाल पोतले यासह विविध पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

मविआमध्ये मिठाचा खडा! ठाकरेंना नाना पटोलेंचं वावडं, थेट बैठकांवरचं बहिष्काराचा इशारा

खेड तालुक्यात शांतता प्रस्थापित व्हावी, चांगले वातावरण राहावे, तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा, भीतीचे वातावरण नष्ट व्हावे यासाठी समाज मान्यता असलेला आणि चांगली वर्तणूक असलेला उमेदवार तालुक्याचा आमदार व्हावा अशी चर्चा या बैठकीत झाल्याचे बैठकीतील एक पदाधिकार्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे..
ही आळंदी विधानसभेसाठी ही अतिशय महत्त्वाची घटना असून आतापर्यंत खेड तालुक्यामध्ये अशा प्रकारे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन अनेक निर्णय केले आहेत. नुकतीच कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता देखील त्याच माध्यमातून परिवर्तन झाली आहे. या प्रमुख नेत्यांना एकत्रित आणत असताना या पाठीमागे तालुक्यातल्या अनेक ज्येष्ठ मंडळींचा देखील हातभार असेल असे बोलले जात आहे.

या मतदारसंघात अजित पवार गटाकडून दिलीप मोहिते हे महायुतीच्या उमेदवार असणार आहेत. शरद पवार गटाकडून अतुल देशमुख, सुधीर मुंगसे, उबाठा गटाचे बाबाजी काळे हे उमेदवार मागत आहे. यातील सुधीर मुंगसे आणि बाबाजी काळे या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे अतुल देशमुख व दिलीप मोहिते या दोघांच्या उमेदवाराला थेट विरोध सुरू झाल्याचे यावरून दिसून येत आहे.

follow us