Download App

किशोर आवारे खून प्रकरणी मोठी अपडेट, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले

Kishor Aaware murder case : तळेगांव दाभाडे येथील (Janseva Vikas Samiti) अध्यक्ष किशोर गंगाराम आवारे (Kishor Gangaram Aware) यांच्यावर शुक्रवारी दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला. त्यात ते गंभीर जखमी झाले होते त्यांनतर त्यांचा मृत्यू झाला. आता याप्रकरणात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. या खून प्रकरणी पुणे शहर पोलिस (Pune City Police) दलाच्या गुन्हे शाखेने एकाला ताब्यात घेतलं आहे. नाना उर्फ संदिप विठ्ठल मोरे असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याची चौकशी केल्यांनतर पुणे पोलिसांनी त्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या (Pimpri Chinchwad Police) ताब्यात दिले आहे.

नाना उर्फ संदिप विठ्ठल मोरे Nana Alias Sandeep Vittal More (रा. पंचतारानगर, संभाजी चोक, गणेश मंदिरजवळ, आकुर्डी – Akurdi) असे पुणे शहर पोलिसांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या स्वाधीन केलेल्याचे नाव आहे. याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर (Sr. PI Pratap Mankar) यांनी माहिती दिली.

आमदार Sunil Shelke अडचणीत, किशोर आवारे खुन प्रकरणी गुन्हा दाखल, मावळमध्ये खळबळ

दरम्यान किशोर आवारे यांची शुक्रवारी भरदुपारी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या (Talegaon Dabhade Municipal Council) समोर गोळया घालून आणि कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे मारेकरी कोयत्याने वार करीत असलेले व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. किशोर आवारे यांच्या खून प्रकरणामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

‘TMKOC च्या’ निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचा आरोपानंतर, फेम जेनिफरने शेअर केला ‘नवा’ व्हिडीओ

किशोर आवारे खून प्रकरणातील संशयित नाना उर्फ संदीप मोरे याच्याबाबत गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथक-2 च्या पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना माहिती मिळाली होती. पोलीस पथकाने तातडीने सापळा रचुन नाना उर्फ संदिप मोरेला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

Tags

follow us