आमदार Sunil Shelke अडचणीत, किशोर आवारे खुन प्रकरणी गुन्हा दाखल, मावळमध्ये खळबळ

आमदार Sunil Shelke अडचणीत, किशोर आवारे खुन प्रकरणी गुन्हा दाखल, मावळमध्ये खळबळ

NCP MLA Sunil Shelke and three other book in Kishor Aaware murder case : तळेगांव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर शुक्रवारी दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला. त्यात गंभीर जखमी झालेल्या आवारे यांना सोमाटणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. किशोर आवारे यांचा जागीच मृत्यू झाला होता. तरी औपचारिकता म्हणून रुग्णालयामध्ये दाखल केले होते.

Pune Crime : येरवडा कारागृहात कॅरम खेळण्याच्या वादातून दोन कैद्यांमध्ये हाणामारी, डोक्यात घातला पाटा…

दरम्यान आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. किशोर आवारेंच्या आईने धक्कादायक आरोप केले होते. आवारे त्यांच्या हत्येचा कट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी केला होता असं आवारे यांच्या आईने आरोप केला होता. त्यानुसार आवारे खुन प्रकरणी सुनील शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे, शाम निगडकर यांच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आवारे यांच्या आईने दाखल दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझा मुलगा किशोर हा सामाजिक काम करत होता. त्याचं काम सुनील शेळके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना खटकत होत. कारण शेळके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या चुकीच्या कामाच्या विरोधात आवारे नेहमीच आंदोलन, निदर्शने करत होते. त्यातून त्यांनी ही हत्या केली. तर गेल्या सहा महिन्यांपासून किशोर आवारे हे शेळके यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत होते. असा आरोप आवारे यांच्या आईने पोलिसांत देखल केलेल्या आरोप पत्रामध्ये म्हटले आहे.

Pune Crime: तळेगाव हादरलं! जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांचा जीवघेण्या हल्ल्यात मृत्यू

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आवारे हे नगरपरिषदेमध्ये कामानिमित्त आले होते. त्यांनी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांची भेट घेऊन ते खाली उतरत असताना दबा धरून असलेल्या चार जणांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे. आवरे यांच्यावर गोळीबारासह कोयत्याने वार करण्यात आले आहे. हल्ला झाल्यानंतर ते त्याच ठिकाणी काही वेळ पडून होते. अज्ञात हल्लेखोरांचा शोध पिंपरी चिंचवड पोलिस घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोमाटणे टोलनाका टोलमुक्त व्हावा, यासाठी किशोर आवारे हे सोमटाने टोलनाका हटाव कृती समितीच्या माध्यमातून ते लढा देत होते, ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण

मिळालेल्या माहितीनुसार, किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन खाली आले होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या ४ जणांनी त्यांच्यावर खूनी हल्ला केला आहे. त्यापैकी दोघाजणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. तर दोन जणांनी कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. आवारे हे रक्‍ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोर काहीवेळ तिथेच थांबून होते. जखमी अवस्थेतील आवारे यांना सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube