‘TMKOC च्या’ निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचा आरोपानंतर, फेम जेनिफरने शेअर केला ‘नवा’ व्हिडीओ

‘TMKOC च्या’ निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचा आरोपानंतर, फेम जेनिफरने शेअर केला ‘नवा’ व्हिडीओ

Mandar Chandwadkar : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कॉमेडी शो (TMKOC) ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मधील रोशन सिंह सोढी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसीवालनं (Jennifer Mistry Bansiwal) असित मोदी आणि सिरीयलच्या टीममधील इतर दोन व्यक्तींवर गंभीर आरोप केले आहेत. मात्र निर्माते असित मोदी यांनी हे आरोप फेटाळले आहेत. त्यातच आता जेनिफरच्या एका व्हिडीओने लक्ष वेधून घेतले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jennifer Mistry Bansiwal🧚‍♀️♾ (@jennifer_mistry_bansiwal)


जेनिफर मिस्त्री ही या प्रकरणानंतर सोशल मीडियावर सक्रीय झाली आहे. तिने नुकंतच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तिने अप्रत्यक्षरित्या निर्माते असित मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे.

“चुप्पी को मेरी कमजोरी मत समझ, मैं चुप थी क्योंकि सलीका है मुझमें। खुदा गवाह है कि सच क्या है। याद रख, उसके घर में कोई फर्क नहीं तुझमें या मुझसे।” अशी एक शायरी ती या व्हिडीओमध्ये सांगत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये ती फारच रागात असल्याचे बघायला मिळत आहे. जेनिफरने हा व्हिडीओला कॅप्शन दिले आहे, “सत्य बाहेर येईल, न्यायाचा विजय होईल” असे यावेळी तिने सांगितले आहे.

अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने एका मुलाखतीत सांगितले आहे की, असित मोदींबरोबरच प्रोजेक्ट हेड सोहेल रमाणी आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांच्याविरोधात लैंगिक छळ केल्याबद्दलची तक्रार दाखल केली होती. असित मोदीने अनेकवेळा माझ्याबद्दल लैंगिक टिप्पणी केली आहे. एकदा तर त्यांनी सर्वांसमोर माझ्यावर लैंगिक टिप्पणी करत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला होता. पण तिथे असलेल्या सहकलाकारांनी या गोष्टी सांभाळून घेतल्या होत्या.

‘TMKOC च्या’ निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर आत्माराम भिडेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

एकदा त्याने मला ‘सेक्सी’ असल्याचे देखील म्हटले होते आणि माझे गालही ओढले होते. असित मोदी माझ्यावर अनेक लैंगिक टिप्पणी करत असायचे. अगोदर मी नोकरी जाण्याच्या भीतीने त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे, पण आता मला हे सहन होत नाही”, असे जेनिफरने त्या मुलाखतीमध्ये सांगितले होते.

दरम्यान या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या सिरियलचे निर्माते असित कुमार मोदी यांनी जेनिफरने केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. आम्ही याबद्दल कायदेशीर कारवाई करु. कारण ती माझी आणि शो दोघांचीही बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. तिचे सर्व आरोप निराधार आहेत, असे असित कुमार मोदी यांनी यावेळी म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube