Chandrkant Patil News : पुण्यातील आंबिल ओढ्यातील पुराच्या पाण्यापासून नागरिकांची सुटका झालीयं. कोथरुड विधानसभा मतदारसंघातील (Kothrud Assembly Constituency) उमेदवार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या पाठपुराव्यामुळे आंबिल ओढ्यातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागलायं. 2019 साली पावसामुळे आंबिल ओढ्याला मोठा पूर आला होता. या पुरामुळे अनेक नागरिकांचं मोठं अर्थिक नूकसान झालं होतं. समस्या जाणून घेत चंद्रकात पाटील यांनी तत्काळ 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन सीमाभिंत बांधून तोडगा काढलायं.
अविस्मरणीय मनोरंजन! गेमिंगचा देव हिदेओ कोजिमा यांनी केलं टायगर 3 चं कौतुक, म्हणाले…
पुणे महापालिका हद्दीतील काही भागांत पुराच्या पाण्यापासून नागरिकांचा बचाव होण्यासाठी भिंती बांधण्यात आल्या आहेत. पुरामुळे नागरिकांना अडचणींना सामोरं जाऊ नये म्हणून पूलही उभारण्यात आले आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे हे काम अपूर्ण राहिले असून याच कामांसाठी चंद्रकात पाटील यांनी पाठपुराव केल्यानंतर कोथरुड परिसरातील नाल्यांवर सीमाभिंती बांधण्यात आल्या आहेत.
मराठवाड्यात निवडणूक पथकाची मोठी कारवाई; हिंगोली, वसमतमध्ये २१ लाख पकडले
विशेष म्हणजे चंद्रकात पाटील यांनी महायुती सत्तेत आल्यानंतर पुरजन्य नाल्यांवर सीमाभिंती बांधण्यासाठी 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलायं. पाटील यांच्या पाठपुराव्यामुळेच पुणेकरांची पुराची समस्या सोडवण्यात आली असून आता नाल्याच्या पुराचा धोका कमी झाला आहे.
Video : निलंग्याला काम करणारा प्रामाणिक नेता मिळालाय; संभाजी पाटलांना साथ द्या -नितीन गडकरी
2019 ला पुर आला होता…
२०१९ च्या पावसाळ्याने पुणेकरांच्या मनात भीतीचे घर केले. कारण मुसळधार पावसामुळे आंबिल ओढ्याला प्रचंड पूर आला आणि ओढ्याच्या पाण्याने अनेक सोसायट्यांमध्ये प्रवेश केला. सोसायट्यांच्या सिमाभिंती कोसळल्या, परिसरात खूप नुकसान झाले. पूर ओसरल्यानंतरही संभाव्य धोका कायमच होता, त्यामुळे नाल्यांच्या सीमाभिंती महत्वाचा मुद्दा महत्त्वाचा ठरला.