Kunal Tilak चंद्रकांत पाटलांवर नाराज… म्हणाले माझ्या आईच्या कामाला दुर्लक्षित करणे बरोबर नाही!

पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कासब्याच्या आमदार स्व. मुक्ता टिळक यांच्या कुटुंबाला पोटनिवडणुकीत डावलल्याचे कारण टिळक कुटुंबाचे कसब्यात दुर्लक्ष असल्यानेच त्यांचे तिकीट कापले, असे दिले आहे. मात्र, त्यावर आक्षेप घेत मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कुणाल टिळक म्हणाले की, माझी आई स्व. मुक्ता […]

Kunal Tilak Chandrakant Patil

Kunal Tilak Chandrakant Patil

पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कासब्याच्या आमदार स्व. मुक्ता टिळक यांच्या कुटुंबाला पोटनिवडणुकीत डावलल्याचे कारण टिळक कुटुंबाचे कसब्यात दुर्लक्ष असल्यानेच त्यांचे तिकीट कापले, असे दिले आहे. मात्र, त्यावर आक्षेप घेत मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कुणाल टिळक म्हणाले की, माझी आई स्व. मुक्ता टिळक यांनी कसबा मतदार संघात गेल्या २५-३० वर्षांत मोठे काम केले आहे. ते दुर्लक्षित करता येणार नाही. ३० वर्षातील काम मतदार दोन महिन्यांत विसरणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच बदल दिसून येईल.

Explainer Baramati Loksabha : ना कुल, ना जानकर… सुप्रिया सुळें विरोधात भाजपचा उमेदवार ठरला! – Letsupp

सोमवारी पत्रकार परिषदेत पुण्याचे पालकमंत्री चंद्रांकांत पाटील यांनी टिळक परिवाराला कसबा निवडणुकात डावलले याचे कारण म्हणजे टिळक परिवाराचं कसब्यात झालेलं दुर्लक्ष, असे दिले आहे. त्या वरती कुणाल टिळक यांनी नाराजी दर्शवत माझ्या आईच्या कामाला दुर्लक्षित करणे बरोबर नाही, असे थेट उत्तर चंद्रकांत पाटील यांना दिले आहे. कसब्याचे सलग २५ आमदार आणि विद्यमान पुणे शहराचे खासदार गिरीश बापट यांचे तसेच माझी आई मुक्ता टिळक यांनी गेली ५० वर्ष जे मतदार संघात काम केलं ते मतदार काही २ महिन्यांत विसरणार नाहीत, असे कुणाल टिळक यांनी स्पष्ट केले आहे.

कुणाल टिळक म्हणाले की, माझ्या आईने गेल्या २५ ते ३० वर्षात कसबा मतदारसंघात खूप काम केले आहे. तिचा कसब्यातील कार्यकर्ते आणि नागरिकांशी चांगला संपर्क होता. तो केवळ दोन महिन्यांत येथील नागरिक विसरणार नाही. येत्या निवडणुकांमध्ये होणारे बदल दिसूनच येतील, असे सूचक वक्तव्य टिळक यांनी केलले आहे.

(233) Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीची फ्लेक्सबाजी | LetsUpp Marathi – YouTube

Exit mobile version