Launch of the Brain Matter digital app! The app will make psychotherapy easier : मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाची मदत घेण्याची आवश्यकता आहे. ही गोष्ट लक्षात घेत पुण्यातील संगीता जोशी यांनी ब्रेन मॅटर या अॅपची निर्मिती केली आहे. रविवारी 3 ऑगस्ट रोजी प्रभात रोड परिसरातील हॉटेल प्रेसिडेंट येथे हा सोहळा झाला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ व अभिनेते डॉ. मोहन आगाशे उपस्थित होते.
काय म्हणाले मोहन आगाशे?
मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाची मदत घेण्याची आवश्यकता आहे. ती काळाची गरज आहे. ब्रेन मॅटर हे डिजिटल अॅप मानसोपचार तज्ज्ञ व विशेषतः या क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी याचा वापर अवश्य करावा. मानसिक उपचारात तंत्रज्ञानाची ही जोड पूरक ठरणारी आहे. जोशी कुटुंबियांनी हे ब्रेन मॅटर हे अॅप विचारपूर्वक व कष्टाने बनवले आहे. असे आवाहन ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ व अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी केले. संगीता जोशी यांनी निर्मिती केलेल्या ब्रेन मॅटर या अॅपच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
Prajakta Mali : प्राजक्ता माळीचा शरारा ड्रेसमध्ये मनमोहक लूक; चाहत्यांचा नजरा हटेना
यावेळी व्यासपाठीवर ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ व भारतीय मानसोपचार सोसायटीचे माजी अध्यक्ष व डॉ. विद्याधर वाटवे, डॉ. सतीश जोशी व संगीता जोशी यांची उपस्थिती होती. या लोकार्पण सोहळ्यास विविध मानसोपचार तज्ज्ञ, या क्षेत्रात काम करणारे संशोधकांची उपस्थिती होती.
‘आयशा’ला 15 वर्षे पूर्ण! सोनम कपूरकडून खास आठवणींना उजाळा, बॉलीवूडची फॅशन आयकॉन…
या संबंधात आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. विद्याधर वाटवे म्हणाले की, यांनी नव्या काळात चांगल्या संकल्पनांची देवाणघेवाण खूप आवश्यक आहे. ज्येष्ठ असून देखील मला अशा प्रकारच्या पूरक तंत्रज्ञानाचा वापर करायला आवडेल. जुन्या पिढीने यातून नवं शिकण्याची ही संधी आहे. असे मला वाटते.
एकच पद पण एकाच दिवशी दोन आदेश, दोघांकडेही अतिरिक्त कार्यभार; फडणवीस-शिंदेंचा सुप्त संघर्ष?
इतर आजारांपेक्षा वेगळ्या असलेल्या मानसोपचार क्षेत्र हे गुंतागुंतीचे व दीर्घकाळ उपचार चालणारे क्षेत्र आहे. अशा वेळी मानसोपचार तज्ज्ञांनी रूग्णांची तपासणी, त्या रूग्णाशी संबंधातील नोंदी, निरीक्षणे, त्याला दिली गेलेली औषधे, फॉलोअप नोटस् व अपॉईंटमेंटस्, सुचविण्यात आलेल्या विविध निदान चाचण्या, त्यांचे विविध रिपोर्टस् या सर्व गोष्टीसंबंधाने मानसोपचारतज्ज्ञांना हाताळणी सुकर व्हावी या हेतूने ब्रेन मॅटर या अॅपच्या निर्मिती करण्यात आल्याचे प्रास्ताविकात संगीता जोशी यांनी सांगितले.
हे क्लाउड बेस्ड अॅप असल्याने मानसोपचारतज्ज्ञ जगभरातून कुठूनही मानसिक स्थितीच्या तपासण्या व सल्लामसलत करू शकतात. असेही संगीता जोशी म्हणाल्या. यावेळी त्यांनी हे ब्रेन मॅटर हे अॅप कसे वापरायचे याचे प्रात्यक्षिक देखील सादर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमोल भगत यांनी केले.
असे आहे ब्रेन मॅटर डिजिटल अॅप
ब्रेन मॅटर अॅपमध्ये रूग्णांची नोंदणी, त्याचा आजारासंबंधी पूर्वइतिहास, त्या संबंधातील निरीक्षणे, त्या निरीक्षणासंबंधाने करावयाच्या चाचण्या, त्यांचे रिपोर्टस्, त्या रूग्णाला देण्यात आलेले प्रिस्क्रिप्शन ही संपूर्ण माहिती डॉक्टरांना अगदी सहजरित्या भरता येते. प्रत्येक वेळी ती उपलब्ध होते. तसेच त्या रूग्णाला तपासणीसाठी पुढील तारीख देखील देता येते.