Laxman Mane on Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) प्रश्नावर अद्यापही तोडगा निघाली नाही. दरम्यान, आता मनोज जरांगे पाटील हे मुंबईत आमरण उपोषण करणार असून ते आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी गावाहून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यांचा पायी मोर्चा आज पुण्यात पोहोचला आहे. ते उद्यापर्यंत मुंबईच्या वेशीवर पोहोचू शकतात. अशातच उपराकार लक्ष्मण माने (Laxman Mane) यांनी जरांगे पाटलांवर जोरदार टीका केली. मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील हे मुनवादी आहेत, असा आरोप माने यांनी केला.
भाजपच्या हाती बडा मासा, काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्याविरोधात उमेदवार ठरला
आज लेट्सअपशी बोलतांना माने यांनी जरांगेंवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, जरांगे सांगतात की, या लोकांच्या हाताखाली काम करावं लागंत. जरांगेंना आमच्या हाताखाली काम करायला लाज वाटते. जरांगे हे काय ब्राम्हण आहेत का? त्यांच्या हाताखाली काम करायला लाज वाटत नाही. मग आमच्या हाताखाली काम करायला का लाज वाटते? ते कायम खालचा आणि वरचा असा भेद करत असतात. असा भेद करणारा माणूस जातीयवादी असतो, अशी टीका माने यांनी केली.
ठाकरे गट रणशिंग फुकणार…संजय राऊतांच्या उपस्थितीत नगरमध्ये महामेळावा
माने म्हणाले, जरांगेच्या आंदोलनात फुले-आंबेडकरांचा फोटो वापरला जात नाही. त्यांचे फोटो लावणं हे जरांगेसाठी घातक आहे. शाहू महाराजांचाही फोटो त्यांच्या मोर्चात दिसत नाही. याचा अर्थ ते मनुवादी आहेत. मराठा समाज हा मनुवादी नाहीत. मात्र, जरांगे मनुवादी आहेत. ते आरएसएसला बळी पडले आहेत, असा टीका मानेंनी केली. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली. मराठा आणि ओबीसी समाजाला वेगळं करण्याचा डाव संघाचा आणि फडणवीसाचा आहे. मतांची फुट पाडणं हे भाजपचा षडयंत्र आहे. याचं कारण एकच आहे. भाजपला पुन्हा सत्ता मिळवायची आहे. त्यामुळं ते जरांगेंनाही मदत करतात आणि छगन भुजबळांनाही मदत करतात.
ते म्हणाले, नेतृत्व करणं सोप नसतं. हाडाची काडं करावी लागतात. दोनदोन पिढ्या लोक काम करतं. मी स्वत: जालन्यात आणि मराठवाड्यात काम काम करतो. मात्र, मला जरांगेचं कामच ठाऊक नाही. हा माणूस धुमकेतूसारखा प्रसिध्दीच्या झोतात आला. आरएसएसच्या पाठिंब्याशिवाय, हे शक्य नाही. जरांगेच्या पाठीमागे संघाची ताकद आहे. आज फडणवीसांना शिव्या देतांना दिसत असेल तरी त्यांनी शिव्या देण्याचेही पैसे मिळतात. शिव्या देणार माणूस पेड नसेल असं समजण्याचं कारण नाही.
जरांगेच्या आंदोलनात घातपाताची शक्यता वाटते का, असं विचारलं असता माने म्हणाले की, मुंबईत काहीही होऊ शकतं. आरएसएस काहीही करू शकतं. त्यांना कसल्याही परिस्थितीच दिल्लीची सत्ता मिळवायची आहे. त्यासाठी इव्हीएमपासून सर्व गोष्टीचा ते वापर करतात. राम मंदिरावरूनही ते राजकारण करतात. राहूल गांधींना मंदिरात जाऊ दिलं नाही. ही हुकुमशाही प्रवृत्ती आहे, असं माने म्हणाले.