पुणे : गेले दहा दिवस मोठ्या भक्तीभावाने गणपती बाप्पाची पूजा करणाऱ्या सर्वच गणेशभक्तांचे डोळे आज पाणावले आहेत. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे साकडे घालत गणरायाला निरोप देण्यासाठी महाराष्ट्र सज्ज झाला असून पुण्या-मुंबईसह राज्यातील कानाकोपऱ्यातील गणरायाच्या विसर्जनाचे रिअल टाईम अपडेट देणारा लेट्सअपचा लाईव्ह ब्लॉग…(Maharashtra Ganpati Visarjan Miravnuk Live Updates)
पुण्यातील कसबा पेठ, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या मानाच्या मंडळाच्या गणपतींचे विसर्जन. रात्री आठ वाजता विसर्जन झाले. सार्वजनिक मंडळांची जल्लोषात मिरवणूक.
पुण्याचे ग्रामदैवत आणि मनाच्या पहिल्या कसबा, मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी, मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीमच्या गणरायाचे विसर्जन.
पुण्यातील मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन. पाच वाजून दहा मिनिटाने विसर्जन.
पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत मोठा उत्साह पाहण्यास मिळत असून, ढोलाताशा पथकांनी शहरातील रस्ते निनादून गेले आहेत. यातील कलावंत या पथकात मराठी मनोरंजन क्षेत्रातील कलांवतांनी ढोल वाजवत मिरवणुकीत अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि अभिनेत्री श्रृती मराठेने ढोल वाजवत आनंद घेतला.
ग्रामदैवत आणि पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे विसर्जन 4 वाजून 35 मिनिटांनी संपन्न झाले आहे. कसबा गणपती टिळक चौकात आल्यानंतर गणपती बाप्पा मोरयाचा जोरदार जयघोष करण्यात आला. सकाळी 10.30 च्या सुमारास कसबा गणपतीच्या मिरवणुकीला पारंपरिक पद्धतीने सुरूवात झाली.
गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने दुपारी चार वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरूवात केली असून, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मिरवणुकीतील आरोग्य रथ बेलबाग चौकात दाखल झाला आहे. तर, मानाचा पहिला कसबा गणपतीचं दुपारी 4 वाजून 35 मिनिटांनी विसर्जन संपन्न झाले आहे.
पतंगा गणपती विसर्जन घाट
१. कसबा गणपती
२.. तांबडी जोगेश्वरी
३. गुरुजी तालीम
पांचाळेश्वर मंदिर गणपती विसर्जन घाट
४. तुळशीबाग
५. केसरीवाडा
६. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
७. शारदा गणपती, मंडई
मुंबईसह राज्यभरात गणपती विसर्जन मिरवणुकीचा उत्साह शिगेला पोहोचण्यास सुरूवात झाली असूनन, मुंबईत विसर्जनाला जाणाऱ्या भाविकांसाठी अलर्ट देण्यात आला आहे. आज रात्री 11 वाजता समुद्राला भरती येणार असल्याचे या काळात भाविक भक्तांनी समुद्र किनारी काळजी घेण्याचे सांगण्यात आले आहे.
धुळे गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर, सहा जण जखमी झाले आहेत. शहरालगत असलेल्या चित्तोडगावात मिरवणूकीदरम्यान झाला अपघात. विसर्जन मिरवणूकीत कार्यकर्ते नाचत असताना अचानक होते मद्यधुंद दुसऱ्या चालकाने ट्रॅक्टर सुरू केला यात ट्रॅक्टर खाली येऊन तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, सहा जण जखमी झाले आहेत.