LIVE : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचे विसर्जन
गेले दहा दिवस मोठ्या भक्तीभावाने गणपती बाप्पाची पूजा करणाऱ्या सर्वच गणेशभक्तांचे डोळे आज पाणावले आहेत.
पुणे : गेले दहा दिवस मोठ्या भक्तीभावाने गणपती बाप्पाची पूजा करणाऱ्या सर्वच गणेशभक्तांचे डोळे आज पाणावले आहेत. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे साकडे घालत गणरायाला निरोप देण्यासाठी महाराष्ट्र सज्ज झाला असून पुण्या-मुंबईसह राज्यातील कानाकोपऱ्यातील गणरायाच्या विसर्जनाचे रिअल टाईम अपडेट देणारा लेट्सअपचा लाईव्ह ब्लॉग…(Maharashtra Ganpati Visarjan Miravnuk Live Updates)
LIVE NEWS & UPDATES
-
पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचे विसर्जन
पुण्यातील कसबा पेठ, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या मानाच्या मंडळाच्या गणपतींचे विसर्जन. रात्री आठ वाजता विसर्जन झाले. सार्वजनिक मंडळांची जल्लोषात मिरवणूक.
-
पुण्यातील मानाच्या गणपतींचे विसर्जन
पुण्याचे ग्रामदैवत आणि मनाच्या पहिल्या कसबा, मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी, मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीमच्या गणरायाचे विसर्जन.
-
तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन
पुण्यातील मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन. पाच वाजून दहा मिनिटाने विसर्जन.
-
पुण्यातील विसर्जन मिरवणूक 'कलावंतांनी' गाजवली; पाहा व्हिडिओ
पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत मोठा उत्साह पाहण्यास मिळत असून, ढोलाताशा पथकांनी शहरातील रस्ते निनादून गेले आहेत. यातील कलावंत या पथकात मराठी मनोरंजन क्षेत्रातील कलांवतांनी ढोल वाजवत मिरवणुकीत अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि अभिनेत्री श्रृती मराठेने ढोल वाजवत आनंद घेतला.
-
मानाच्या पहिला कसबा गणपतीचे विसर्जन
ग्रामदैवत आणि पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे विसर्जन 4 वाजून 35 मिनिटांनी संपन्न झाले आहे. कसबा गणपती टिळक चौकात आल्यानंतर गणपती बाप्पा मोरयाचा जोरदार जयघोष करण्यात आला. सकाळी 10.30 च्या सुमारास कसबा गणपतीच्या मिरवणुकीला पारंपरिक पद्धतीने सुरूवात झाली.
-
दगडूशेठ गणपतीचा रथ बेलबाग चौकात दाखल
गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने दुपारी चार वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरूवात केली असून, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मिरवणुकीतील आरोग्य रथ बेलबाग चौकात दाखल झाला आहे. तर, मानाचा पहिला कसबा गणपतीचं दुपारी 4 वाजून 35 मिनिटांनी विसर्जन संपन्न झाले आहे.
-
कुठे होणार पुण्यातील मानाच्या गणपतींचे विसर्जन
पतंगा गणपती विसर्जन घाट
१. कसबा गणपती
२.. तांबडी जोगेश्वरी
३. गुरुजी तालीमपांचाळेश्वर मंदिर गणपती विसर्जन घाट
४. तुळशीबाग
५. केसरीवाडा
६. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
७. शारदा गणपती, मंडई
-
समुद्राला येणार रात्री भरती, भाविकांसाठी अलर्ट
मुंबईसह राज्यभरात गणपती विसर्जन मिरवणुकीचा उत्साह शिगेला पोहोचण्यास सुरूवात झाली असूनन, मुंबईत विसर्जनाला जाणाऱ्या भाविकांसाठी अलर्ट देण्यात आला आहे. आज रात्री 11 वाजता समुद्राला भरती येणार असल्याचे या काळात भाविक भक्तांनी समुद्र किनारी काळजी घेण्याचे सांगण्यात आले आहे.
-
गणपती विसर्जनावेळी धुळ्यात अपघात; तिघांचा मृत्यू
धुळे गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर, सहा जण जखमी झाले आहेत. शहरालगत असलेल्या चित्तोडगावात मिरवणूकीदरम्यान झाला अपघात. विसर्जन मिरवणूकीत कार्यकर्ते नाचत असताना अचानक होते मद्यधुंद दुसऱ्या चालकाने ट्रॅक्टर सुरू केला यात ट्रॅक्टर खाली येऊन तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, सहा जण जखमी झाले आहेत.
-
लालबागचा राजावर श्रॉफ बिल्डिंगवरून फुलांची उधळण
सालाबादप्रमाणे यंदाही लालबागचा राजावर श्रॉफ बिल्डिंगवरून फुलांची उधळण करण्यात आली.https://twitter.com/ANI/status/1835957320045514961
-
विसर्जनाच्या दिवशीच 'जिओ'चं नेटवर्क गायब, युजर्स हैराण
10 दिवस बाप्पाची सेवा केल्यानंतर आज अखेर बाप्पााला निरोप देण्याची वेळ आली आहे. मुंबईतील लालबागचा राजा मंगळवारी सकाळी विसर्जनासाठी मंडपातून निघाला आहे. दरम्यान, गणपती विसर्जनाच्या दिवशीच सकाळपासून मुंबईत जिओचे सर्व्हर डाऊन झाले आहे. यानंतर सोशल मीडियावर यूजर्सकडून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येण्यास सुरूवात झाली आहे.
Mumbaikars please update status of your Jio network 😢 #Jiodown ? pic.twitter.com/tQGtCq3PdN
— Miss Ordinaari (@shivangisahu05) September 17, 2024
-
मानाचा पाचवा केसरीवाड्याचा गणपती
पुण्यातील मानाचा पाचवा केसरीवाड्याचा गणपती मंडळाची लाकडी पालखीत श्रींच्या मूर्तीची रथातून मिरवणूक निघाली आहे. बिडवे बंधूंचा नगारा, शिवमुद्रा, श्रीराम आणि आवर्तन ढोल-ताशा पथके हे विसर्जन मिरवणूकीचे मुख्य आकर्षण आहे. विठ्ठलाची भव्य मूर्ती असलेला माऊली रथ मिरवणुकीचे आकर्षण आहे. यंदा विशेष बाब म्हणजे इतिहास अभ्यासक मोहन शेटे हे लोकमान्य टिळक यांच्या वेशभूषेत आहेत
-
मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम बेलबाग चौकात
पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरूवात झाली असून, मानच्या तीन गणपतींची मिरवणूक बेलबाग चौकात चौकात पोहोचला आहे. गुरुजी तालीम मंडळाचा गणपतीची मिरवणूक यंदा स्वप्निल व सुभाष सरपाले यांनी बनविलेल्या आकर्षक फुलांच्या सूर्यरथात रथातून निघाली आहे. यंदा पालखीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे जयंत नगरकर यांचे नगारावादन, अश्वराज ब्रास बँन्ड आहे. तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळा (फुलगांव) प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. तर, नादब्रह्म, नादब्रह्म ट्रस्ट, गर्जना ढोलताशा पथके ढोल वादन करणार आहेत. यंदा विशेष बाब म्हणजे राज्यात प्रथमच सुरू झालेलं तृतीय पंथीयांचं शिखंडी पथक आपलं वादन या विसर्जन मिरवणुकीत वादन करत करत आहे.
-
पुण्यात विसर्जन मिरवणुकीत व्यसनमुक्ती थीमवर भव्य रांगोळ्यांचे प्रदर्शन
पुण्यातील गणेशोत्सवच्या सार्वजनिक मिरवणुकीला सुरुवात होत आहे मिरवणुकीसाठी पुण्यातील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ भव्य रांगोळी काढण्यात आली आहे. राष्ट्रीय कला अकादमीतर्फे 30 फुटी रांगोळी साकारण्यात आली आहे. व्यसनमुक्ती या थीमवर अकादमी कडून भव्य रांगोळ्या काढून पायघड्याही घालण्यात आल्या आहेत. मंडई पासून ते अलका चौकापर्यंत रांगोळीच्या पायघड्या घालण्यात येणार आहेत.
-
बाप्पा, माझ्या नेत्याला आमदार कर…; लालबागचा राजाच्या चरणी चिठ्ठी
लालबागचा राजाच्या दर्शनासाठीही आज गर्दी पाहायला मिळाली. यावेळी एक चिठ्ठी बाप्पाच्या चरणी ठेवण्यात आली. यात आगामी विधानसभा निवडणुकीत यश मिळावं, यासाठी प्रार्थना करण्यात आली आहे. बाप्पा, माझ्या नेत्याला आमदार कर…, अशी प्रार्थना लालबागचा राजाच्या चरणी करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून 2024 चा शिवडी विधानसभा आमदार सुधीर भाऊ साळवी चिठीमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.

-
अजितदादांची सपत्नीक मंडई गणपतीची आरती
विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होण्यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सपत्नीक मंडईतील शारदा गणपतीची आरती केली.
ॐ श्रीं गं सौभाग्य गणपतये वर्वर्द सर्वजन्म में वषमान्य नमः॥
मंडईतील शारदा गणपती बाप्पांची सपत्नीक मनोभावे आरती केली. सर्व समाजघटकांच्या आनंदासाठी प्रार्थना केली. pic.twitter.com/SiHouX9jWg
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 17, 2024
-
पुणेकरांनो वाहतूक कोंडीसाठी रिंग रोडचा वापर करा
पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरूवात झाली आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी शहरातील मुख्य रस्ते वाहतकीसाठी उद्या दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. याशिवाय 13 ठिकाणी वाहनतळांची सोय करण्यात आली आहे. मिरवणुक काळात वाहतूक कोंडी होऊ नये यासठी पुणे पोलिसांकडून नागरिकांना रिंगरोडचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सर्व नागरिकांना वाहतूक शाखेकडून कळविण्यात येते की गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान कृपया रिंग रोड चा वापर करावा.... #punecity pic.twitter.com/xfFGklmPeZ
— पुणे शहर वाहतूक पोलीस (@PuneCityTraffic) September 16, 2024
-
अजित पवारांचं गणेश भक्तांना आवाहन
मला दगडूशेठ हलवाई मंडळातल्या सहकाऱ्यांनी सांगितलं की त्यांचं विसर्जन साधारण संध्याकाळी ४ वाजता करण्याचं नियोजन केलं आहे. तसं झालं आणि सर्व गणेश मूर्तींचं त्या त्या दिवशीच विसर्जन झालं तर पोलीस, नागरिकांच्या दृष्टीनं ते बरं होतं. नाहीतर ३६ तास मिरवणूक चालली तर पोलिसांवरही अतिरिक्त ताण निर्माण होतो. सगळ्यांनी अशा उत्सवाच्या वेळी आपली कर्तव्य, बंधनांचं पालन करावं. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी राज्य सरकार व पोलीस यंत्रणेवर असते. नागरिकांनीही त्यांच्यावरची बंधनं पाळावीत असे आवाहना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी केलं आहे.
-
पुण्यातील मानाचे गणपती मार्गस्थ
पुण्याच्या गणपती उत्सवाचे सर्वांनाच आकर्षण असते. गेले दहा दिवस राज्यासह देशातील आणि जगभरातील भाविकांनी पुण्यातील गपणती उत्सवात भाग घेत गणरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर आता मंडईतील टिळक पुतळ्यापासून गणपती विसर्जन मिरवणुकीला ढोल ताशांच्या गजरात सुरूवात झाली असून, मानचा कसबा गणपतीसह अन्य मानाच्या गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाले आहेत.
