Loan of 409 crore approved for Rajgad Sugar Factory : राज्य सरकारने भोर तालुक्यातील राजगड सहकारी साखर कारखान्याला (Rajgad Cooperative Sugar Factory) 409 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. हा कारखाना माजी काँग्रेस आमदार आणि आता भाजप नेते संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांच्या नियंत्रणाखाली आहे. मंगळवारी (26 ऑगस्ट) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet meeting) हा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून (NCDC) हे कर्ज मिळणार असून, राज्य सरकारने त्यासाठी हमी दिली आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवला होता.
जरांगे मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम, आज सकाळी 10 वाजता मराठा बांधव अंतरवली सराटीहून निघणार
अजितदादांचा विरोध, फडणवीसांची मंजूरी..
अजित पवार यांनी कारखान्याची आर्थिक स्थिती आणि त्याची परतफेड क्षमता यावर प्रश्न उपस्थित केले. त्यांचे म्हणणे होते की, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळापासून या कारखान्याला सरकारी मदत मिळत आहे, तरीही तो आर्थिक संकटात आहे. भोर परिसरात ऊसाचे उत्पादन कमी असल्याने एवढ्या मोठ्या कर्जाची गरज आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तरीही, मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा प्रस्ताव मंजूर केला.
दरम्यान, संग्राम थोपटे हे काँग्रेसचे तीनवेळा आमदार होते. गेली विधानसभा निवडणुकही त्यांनी काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत एप्रिलमध्ये भाजपात प्रवेश केला. केला होता. यानंतरच लगेच गेल्या काही वर्षापासून अडचणीत असलेल्या राजगड सहकारी साखर कारखान्याला 409 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झालं. त्यामुळं भाजप प्रवेश केल्यानंतरच थोटपटेंना आर्थिक पाठबळ मिळाल्याची चर्चा आहे.
सर्व भारतीयांचा DNA एकच, हिंदू राष्ट्राचा सत्तेशी काहीही संबंध नाही; सरसंघचालकांचे मोठे विधान
थोपटे आणि पवार कुटुंब यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत थोपटे यांनी सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिल्याने अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा बारामतीत पराभव झाला होता. यानंतर थोपटेंच्या कारखान्याचे 80 कोटींचे कर्ज रद्द झाले होते, अशीही माहिती आहे. यामागे राजकीय कारणे असल्याचा दावा थोपटे यांनी केला होता.
दरम्यान, कर्ज मंजूर झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना थोटपेंनी या कर्ज मंजुरीचा त्यांच्या पक्षांतराशी संबंध नाही, तर कारखान्याच्या गरजेसाठी हा निर्णय घेतला गेला असल्याचं सांगितलं.