पुण्यात काँग्रेसला धक्का! संग्राम थोपटेंनंतर ‘या’ बड्या नेत्याचा राजीनामा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार

पुण्यात काँग्रेसला धक्का! संग्राम थोपटेंनंतर ‘या’ बड्या नेत्याचा राजीनामा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार

Maharashtra Politics : राज्यातील विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्षातील नेते (Congress Party) अस्वस्थ झाले आहेत. त्यांच्यापुढे आता त्यांच्या राजकीय भवितव्याचं संकट आहे. आगामी काळात राजकारणात अस्तित्व टिकवायचं असेल तर पक्षांतराशिवाय पर्याय नाही इतकं त्यांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे आता काँग्रेसला गळती लागली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे मातब्बर नेते संग्राम थोपटे यांनी कालच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. या धक्क्यातून सावरण्याआधीच काँग्रेसला दुसरा धक्का बसला आहे.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सरचिटणीस पदाचा राजीनामा पक्षाकडे सोपवला आहे. रोहन सुरवसे आता लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (Ajit Pawar NCP) पक्षात प्रवेश करणार आहेत.

Video : अखेर सपकाळांच्या इनबॉक्समध्ये ‘तो’ ई-मेल आलाच; थोपटेंनी काँग्रेसचा ‘हात’ सोडला

काँग्रेस पक्षाचा आक्रमक चेहरा म्हणून रोहन सुरवसे पाटील ओळखले जातात. शहरातील विविध आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अतिशय वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचं समर्थन करत रोहन सुरवसे पाटील यांनी सारसबागेतील सावरकर पुतळ्याजवळ माफीवी असा फलक लावला होता. या कृत्याबद्दल त्यांना अटकही झाली होती.

संग्राम थोपटेंनीही काँग्रेसचा हात सोडला

संग्राम थोपटे यांनी दिला पक्षाला अखेर रामराम केला आहे. त्यांनी शनिवारी आपल्या काँग्रेस पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना इमेल द्वारे राजीनामा पाठवला आहे. या निर्णयानंतर पुढील निर्णयाच्या अनुषंगाने आज संग्राम थोपटे कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहे. त्यांनी भोरमधील सगळ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना निमंत्रण दिलं आहे. गेल्या महिन्याभरातला काँग्रेसला हा दुसरा धक्का आहे. काही दिवसांपुर्वीच काँग्रेसचे नेते रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेसला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Video : भांडणं नव्हतीच मिटवून टाकली चला; राज ठाकरेंच्या प्रस्तावाला उद्धव ठाकरेंचा ‘ग्रीन सिग्नल’

follow us
  • fb
  • instagram
  • youtube